शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फास्टॅग नसेल तर द्यावा लागेला दुप्पट टोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:09 IST

कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटकरिता १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य महामार्ग आणि शहरी टोल नाक्यावर फास्टॅगने टोल स्वीकारला जाणार आहे.

ठळक मुद्देडिसेंबरपासून वाहनांवर फास्टॅग अनिवार्य : नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्राम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटकरिता १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य महामार्ग आणि शहरी टोल नाक्यावर फास्टॅगने टोल स्वीकारला जाणार आहे.नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्रामअंतर्गत केंद्र शासनाने १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व प्रकारच्या मोटर वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य केले आहे. ज्या वाहनांवर फास्टॅग राहणार नाही, त्या वाहनचालकाकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या महिन्यात डिसेंबरपासून फास्टॅग लागू करण्याची घोषणा केली होती.काय आहे फास्टॅग?फास्टॅग सिस्टिमच्या माध्यमातून वाहनांना टोल नाक्यावर न थांबता टोल चुकता करता येतो. याकरिता वाहनांवर फास्टॅग लावणे आवश्यक आहे. हा फास्टॅग अधिकृत टॅग जारीकर्त्या बँकांकडून खरेदी करता येतो.असे करते कामटोल नाक्यावर ऑटोमॅटिक ट्रान्सजेक्शनकरिता वाहनाच्या विंडस्क्रीनमध्ये फास्टॅग लावता येतो. यामध्ये रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन लागले असते. वाहन टोल नाक्याजवळ जाताच सेन्सर टॅगला स्कॅन करतो. त्यानंतर फास्टॅग अकाऊंटमधून शुल्क कापले जाते. खात्यातील रक्कम संपल्यानंतर रिचार्ज करावा लागतो. फास्टॅगची वैधता पाच वर्षांची असते. अर्थात पाच वर्षांनंतर वाहनचालकांना दुसऱ्यांदा फास्टॅग लावावा लागतो.या कागदपत्रांची आवश्यकताफास्टॅगकरिता वाहनाची आरसी, वाहन मालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो, केवायसी कागदपत्रे आणि घराचा पत्ता असलेले एक कागदपत्र आवश्यक असते.कशाप्रकारे करता येईल रिचार्ज?कोणत्याही वाहनचालकाला आपल्या फास्टॅग अकाऊंटला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून रिचार्ज करता येते. फास्टॅग खाते कमीत कमी १०० रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेने रिचार्ज करता येऊ शकते. याशिवाय एसबीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, पंजाब नॅशनल बँकांसह पेटीएमच्या माध्यमातून फास्टॅग अकाऊंट करता येते.फास्टॅगचे फायदेकारवर लागलेल्या फास्टॅगच्या मदतीने वाहनचालकांची वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. फास्टॅग एक पारदर्शी व्यवस्था आहे. त्यामुळे टोल नाक्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही. वाहनांमध्ये कोण बसले आहेत, त्याचीही माहिती मिळेल. त्यामुळे गुन्हे आणि गुन्हेगारांवर नियंत्रण येण्यास मदत मिळेल. फास्टॅगला जीएसटी नेटवर्क सोबत जोडण्यात आले आहे. या यंत्रणेत वाहनमालक आणि वाहनाची माहिती असल्याने ही यंत्रणा आधारच्या धर्तीवर काम करेल.एवढेच नव्हे तर सर्व मार्ग फास्टॅगचे झाल्यास केवळ एकाच मार्गावर रोख स्वीकारली जाईल. फास्टॅगचा उपयोग करणाऱ्यांना कॅशबॅकचा फायदाही मिळू शकेल.एसएमएसची सुविधाफास्टॅग लागलेले वाहन कोणताही टोल नाक्यावरून जात असेल आणि चालकाच्या फास्टॅग खात्यातून रक्कम कापली जाताच वाहनचालकांच्या मोबाईलवर एक मॅसेज येईल आणि त्या माध्यमातून फास्टॅग अकाऊंटमधून किती रक्कम कापली, याची माहिती मिळेल.या अडचणी केव्हा दूर होणार?फास्टॅगमुळे वाहनचालकांना फायदा मिळेल. पण सध्या टोल नाक्यावर फास्टॅग संदर्भात ज्या अडचणी येत आहेत, त्यावर वाहनचालकांना खरंच दिलासा मिळेल का, हा प्रश्न गंभीर आहे. टोल नाक्यावर आताही नेटवर्कची समस्या नसल्यामुळे बहुतांशवेळी वाहनचालकांना थांबावे लागते. अनेक ठिकाणी कॅमेरे सुरळीत नसल्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचारी फास्टॅगला हाताने स्कॅन करताना दिसून येत आहेत. आताही नाक्यावर फास्टॅगचे मार्ग जास्त नसल्यामुळे फास्टॅग लागलेल्या वाहनांना काही टोल नाक्यावर समस्या येत आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाcarकार