शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांकडून मला नेहमीच प्रोत्साहन मिळाले

By admin | Updated: December 20, 2015 03:02 IST

काही पत्रकार स्वकर्तृत्वावर आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाने समोर येतात. त्यांच्या शोधपत्रकारितेमुळे समाजाचे नुकसान थांबते आणि समाज उन्नत होतो.

मुख्यमंत्री फडणवीस : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार नागपूर : काही पत्रकार स्वकर्तृत्वावर आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाने समोर येतात. त्यांच्या शोधपत्रकारितेमुळे समाजाचे नुकसान थांबते आणि समाज उन्नत होतो. विधानभवनात विरोधक म्हणून काम करताना एखादा मुद्दा मांडल्यावर तो मुद्दा योग्य पद्धतीने मांडल्याचे प्रोत्साहन मला अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी दिले. त्याचा मला लाभ झाला. मी केलेल्या चांगल्या कामाबद्दल नेहमीच पत्रकारांकडून मला प्रोत्साहन मिळाले, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि ट्रस्ट यांच्यावतीने राज्य अधिस्वीकृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल लोकमत मुंबईचे विशेष प्रतिनिधी यदु जोशी आणि ज्येष्ठ महिला संपादक राही भिडे यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, ब्रम्हाशंकर त्रिपाठी, शिरीश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कोमल ठाकरे यांनी तर आभार प्रदीप मैत्र यांनी मानले. (प्रतिनिधी)