नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 05:29 PM2022-09-13T17:29:06+5:302022-09-13T17:37:26+5:30

राज ठाकरे का करत नाहीत विमानानं प्रवास, सांगितलं कारण  

i always go to nagpur by train, raj thackeray tells the special reason behind train journey | नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण

नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण

Next

सुरभी शिरपूरकर 

नागपूरमनसे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या रोखठोक बोलल्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यंदा त्यांच्या बोलण्यावरून सगळ्यांनाच हसू अनावर झालय. कारण त्यांनी एक असा मजेशीर किस्सा सांगितला जे ऐकून तुम्हालाही हसायला नक्कीच येणार.

ते झालं असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे 17 सप्टेंबरपासून विदर्भ दौऱ्यासाठी रवाना होतील. मात्र राज ठाकरे हे नागपूरला विमानानं नं जाता ट्रेननं प्रवास करणार आहेत.  मुंबईत मनसेच्या पक्षांतर्गत बांधणी संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीत पत्रकारांशी चर्चा करताना आपल्या खास शैलीमध्ये काही सूचक विधान करताना नागपूरला ट्रेनने का जाणार या संदर्भात त्यांनी मजेशीर भाष्य केलं.

पत्रकारांनी विदर्भ दौऱ्यासंदर्भात विचारलं असता राज यांनी सध्या काही डबे जोडण्याचं काम सुरू आहे, असे उत्तर दिले.  त्यानंतर एका पत्रकाराने तुम्ही नागपूरला ट्रेन ने का चालले असा प्रश्न विचारला असता त्यावर राज यांनी लगेच उत्तर दिलं. ते बोलले. मी काही पहिल्यांदा ट्रेनने जात न्हाईये. यापूर्वी जेव्हाही मी नागपूरला गेलो तेव्हा ट्रेननेच गेलोय. विमानाच्या वेळा या फारच पहाटेच्या आहेत. पहाटे 4 ला एअरपोर्टला पोहोचावं लागतं, एवढ्या सकाळी उठून कोण जाईल.. इतक्या सकाळी तिथं जाऊन काय करायचं, असा प्रतिप्रश्न राज यांनी  केला.  राज यांचा हा प्रश्न ऐकून उपस्थितांनाही हसू आवरता आलं नाही.

त्याच प्रमाणे राज यांनी नंतर जेटलॅग टाळण्यासाठी आपण रेल्वेत जात असल्याचं सांगितलं. राज उपरोधितपणे हे विधान करत असतानाच एका पत्रकाराला हे खरं वाटलं. राज यांनी हसतच नागपुरला कसला आलाय जेटलॅग असं म्हणत तिथून हसतच निघून गेले.

विदर्भ दौरा

राज ठाकरे हे 17 सप्टेंबरला मुंबईहून रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. 18 ला सकाळी त्यांचे नागपूरला आगमन होईल. येथे त्यांचा दोन दिवस मुक्काम आहे. या दोन दिवसाच्या दौऱ्या ते विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि नंतर २० तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी निघतील. तेथे दोन दिवस पश्चिम विदर्भातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि 23 ला अमरावतीहून मुंबईकडे रवाना होतील.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा विदर्भाचा हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातोय. महापालिका निवडणुकीची लगबग सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आपला झेंडा विदर्भात फडकविणार  का? राज ठाकरेंचा रोखठोकपणा विदर्भीयांना आवडेल का? हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरेल.

Web Title: i always go to nagpur by train, raj thackeray tells the special reason behind train journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.