शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

शिकारी दारात; यंत्रणा कोमात!

By admin | Updated: November 22, 2015 02:57 IST

वाघाच्या शिकारीसाठी कुख्यात ‘बहेलिया टोळी’ पुन्हा विदर्भातील जंगलाच्या दारात पोहोचली आहे. त्यासंबंधी ‘वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (डब्ल्यूसीसीबी) ...

‘हाय अलर्ट’ : ‘अँटी पोचिंग स्क्वॉड’ व ‘मोबाईल स्क्वॉड’ केवळ नावालाजीवन रामावत  नागपूरवाघाच्या शिकारीसाठी कुख्यात ‘बहेलिया टोळी’ पुन्हा विदर्भातील जंगलाच्या दारात पोहोचली आहे. त्यासंबंधी ‘वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (डब्ल्यूसीसीबी) व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) अलीकडेच संपूर्ण राज्यात ‘हाय अलर्ट’ जारी केलाआहे. परंतु त्याच वेळी वाघाच्या संरक्षणाची धुरा असलेली नागपूर वन विभागाची सुरक्षा यंत्रणाच कोलमडून पडली आहे. शिकाऱ्यांशी दोन हात करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले ‘अँटी पोचिंग स्क्वॉड’ व ‘मोबाईल स्क्वॉड’ केवळ नावापुरते शिल्लक आहेत. यामुळे वन विभाग हतबल झाला असून, वाघाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नागपूर विभागीय कार्यालयात एक ‘अ‍ॅन्टी पोचिंग स्क्वॉड’ व दोन ‘मोबाईल स्क्वॉड’ आहेत. परंतु यापैकी ‘अँटी पोचिंग स्क्वॉड’ व एका ‘मोबाईल स्क्वॉड’ला अधिकारीच नसून, वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) वाघे हे एकटेच दोन्ही ‘मोबाईल स्क्वॉड’ व उमरेड (पाचगाव) येथील रेंजचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना मोबाईल स्क्वॉडकडे लक्ष देण्यासाठी सवडच मिळत नसून, पाचगाव रेंजमध्ये व्यस्त झाले आहेत. शिवाय ‘अँटी पोचिंंग स्क्वॉड’चे सहायक वनसंरक्षक (एसीएफ) बी. एच. वीरसेन यांची अलीकडेच प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अजूनपर्यंत कुणालाही पाठविण्यात आलेले नाही. दक्षता विभागाची गस्त नागपूर वन विभागातर्फे सर्व उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांना ‘हाय अलर्ट’ ची माहिती देउन त्यांना गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचवेळी नागपुरातील ‘अँटी पोचिंग स्क्वॉड’ व ‘मोबाईल स्क्वॉड’ ला अधिकारी नसल्याने फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. तरी दक्षता विभाग शिकाऱ्यांपासून वाघाची सुरक्षा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या भरवशावर गस्त केली जात आहे. - केवल डोंगरे, विभागीय वन अधिकारी (दक्षता)