शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

नागपुरात उपाशी पत्नीला पाजले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 10:08 PM

भांडणामुळे तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या पत्नीला दारुड्या पतीने विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार यशोधरानगरात घडला.

ठळक मुद्देतीन दिवसांपूर्वीच भांडण : पती म्हणतो, तिने विष घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भांडणामुळे तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या पत्नीला दारुड्या पतीने विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार यशोधरानगरात घडला. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला असून त्याने पत्नीनेच विष घेतल्याचा दावा केला आहे.यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी पती देवेंद्र रामटेके (२७ वर्षे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्रचा २०१७ मध्ये पत्नी अश्विनीसोबत विवाह झाला होता. अश्विनीच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर तो तिला सतत पैशासाठी त्रास द्यायचा, छळही करायचा. एवढेच नाही तर शिव्या व धमकी देत असे. नेहमीप्रमाणे दारू पिऊन आल्यावर देवेंद्रने तिच्याशी वाद घातला व मारहाण केली. त्यामुळे ती प्रचंड तणावात होती. तीन दिवसांपासून तिने काहीच खाल्ले नव्हते. अशात देवेंद्रने मारहाण करून तिला विष पाजल्याची पत्नीची तक्रार आहे.पोलिसात तक्रार करण्यासाठी ती यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहचली. मात्र तिथेच तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे नातेवाईकांनी मेयोमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान अश्विनीने देवेंद्रच्या कृत्याची माहिती पोलिसांना आणि नातेवाईकांना दिली. यावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र देवेंद्रने आरोप फेटाळले असून पत्नीनेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर