शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कशी होईल वाहतूक सुरळीत?

By admin | Updated: November 23, 2014 00:37 IST

नागपूरकरांना बहुप्रतिक्षित असलेल्या रामझुल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अधिवेशन काळात रामझुल्याचा उद्घाटन समारंभही पार पडण्याची अपेक्षा आहे. परंतु हा रामझुला सुरू झाल्यानंतर

जयस्तंभ चौकात वाहतुकीची कोंडी : रामझुल्यासह पाच रस्ते येणार एकाच ठिकाणी नागपूर : नागपूरकरांना बहुप्रतिक्षित असलेल्या रामझुल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अधिवेशन काळात रामझुल्याचा उद्घाटन समारंभही पार पडण्याची अपेक्षा आहे. परंतु हा रामझुला सुरू झाल्यानंतर जयस्तंभ चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता असून त्याचा नागरिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रामझुल्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर हा रामझुला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. रामझुला जेथे खाली उतरतो त्या परिसरात पाच रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. रामझुल्यावरून येणारे नागरिक याच चौकात उतरणार आहेत. याशिवाय रामझुल्याच्या शेजारील मेयो हॉस्पिटलकडून येणारे वाहनचालकही येथूनच रेल्वेस्थानकाकडे किंवा गणेश टेकडीच्या उड्डाण पुलावर जातील. याशिवाय कस्तूरचंद पार्ककडून येणारे प्रवासीही रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी याच चौकातून मार्ग काढतील. त्यामुळे या चौकात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रामझुला पुढील चौकात खाली उतरविला असता तर ही कोंडी झाली नसती असे मतही व्यक्त करण्यात येत आहे. आता प्रशासन याबाबतीत काय निर्णय घेते आणि येथे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी काय उपाययोजना करते हे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दीरामझुला जेथे खाली उतरतो त्या चौकातून रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या वाहनचालकांची मोठी गर्दी असते. रेल्वेस्थानकावर दिवसभर प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अनेक वाहने याच चौकातून दिवसभर रेल्वेस्थानकाकडे जातील. या वाहनांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.कस्तूरचंद पार्ककडून येणाऱ्या वाहनांचा प्रश्नदुपारी ४ नंतर कस्तूरचंद पार्ककडून मेयो रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहनचालकांची गर्दी वाढते. सायंकाळी ५ वाजता तर सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज संपल्यामुळे या रस्त्यावर कमालीची गर्दी पाहावयास मिळते. सायंकाळच्या सुमारास या चौकात मोठी गर्दी होणार असल्यामुळे ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.टेकडी उड्डाणपुलावरील वाहतुकीची कोंडीटेकडी उड्डाणपुलावरून अनेकजण रेल्वेस्थानकावर येतात. त्यांना उड्डाणपुलावरून खाली उतरल्यानंतर थेट रेल्वेस्थानकावर प्रवेश देण्यात येईल की त्यांना कस्तूरचंद पार्कजवळील सिग्नलपर्यंत फेरा मारावा लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे टेकडी उड्डाणपुलावरील वाहतुकीचीही कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.‘डीआरएम’ कार्यालयातील वाहनांचा प्रश्नरामझुला जेथे खाली उतरतो तेथे बाजूलाच मध्य रेल्वेचे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे ‘डीआरएम’ कार्यालय आहे. या कार्यालयात असंख्य अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. त्यांनाही याच चौकातून ये-जा करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांची वाहने कुठल्या बाजूने काढण्यात येतील हा प्रश्न आहे.