शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला : हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:03 IST

नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली.

ठळक मुद्देसरकारला मागितला अहवाल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे व फरार असलेल्या किती आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली आणि यावर एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आरोपी फरार असल्यामुळे राज्यातील विविध न्यायालयांमध्ये हजारो खटले प्रलंबित आहेत. त्यासंदर्भातील आकडेवारी लक्षात घेता न्यायालयाने यावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेची व्याप्ती वरील पाच जिल्ह्यांपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. ३ वर्षे व त्यापेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांतील जे खटले आरोपी फरार असल्यामुळे १० वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित आहेत त्यांचा या याचिकेत विचार केला जात आहे.सरकारच्या प्रतिज्ञापत्रानुसार, आरोपी फरार असल्यामुळे नागपूर शहरातील ३३४९ तर, नागपूर ग्रामीणमधील ४१७ खटले प्रलंबित आहेत. आतापर्यंत या खटल्यांतील सुमारे ८०० फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरामधील १९४० खटल्यांतील आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट तर, ११६८ खटल्यांतील आरोपींविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावण्यात आले होते. तसेच, उर्वरित २४१ खटल्यांतील आरोपींविरुद्ध घोषणापत्र जारी करण्यात आले होते. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDeathमृत्यू