शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईत जाता कशाला!

By admin | Updated: July 28, 2015 04:05 IST

प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरसाठी विदर्भात उपचाराची सोय उपलब्ध आहे. नागपुरात तीन रुग्णालयांसह वर्धा, अकोला व

डॉ. मदन कापरे : विदर्भातच प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरवर उपचार शक्य नागपूर : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरसाठी विदर्भात उपचाराची सोय उपलब्ध आहे. नागपुरात तीन रुग्णालयांसह वर्धा, अकोला व अमरावती रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा आहे. तज्ज्ञ डॉक्टर आहेत. गरीब रुग्णांसाठी विविध योजना आहेत, विशेष म्हणजे, येथे राहण्याची समस्या नाही, भाषेची समस्या नाही आणि थेट डॉक्टरांशी संवाद साधता येतो. असे असतानाही अनेक रुग्ण उपचारासाठी दिल्ली, मुंबईत जाऊन पैसा खर्च करतात, अशी खंत वरिष्ठ ईएनटी सर्जन व विदर्भ सोसायटी आॅफ हेड अ‍ॅण्ड नेक ओन्कोलॉजीचे अध्यक्ष डॉ. मदन कापरे यांनी येथे व्यक्त केली. विदर्भ सोसायटी आॅफ हेड अ‍ॅण्ड नेक ओन्कोलॉजी व रोटरी क्लब आॅफ नागपूर साऊथ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वर्ल्ड हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर डे’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव व सर्जिकल पॅथालॉजिस्ट डॉ. आर. रवी, कॅन्सर सर्जन डॉ. अभिषेक वैद्य व रोटरी क्लब आॅफ नागपूर साऊथचे अध्यक्ष अ‍ॅड. जयंत मोकादम उपस्थित होते. २० टक्के युवक १२ व्या वर्गात जाण्यापूर्वीच तंबाखूच्या जाळ्यात अडकतातडॉ. कापरे म्हणाले, दरवर्षी २.७४ लाख नवीन कॅन्सरचे रुग्ण समोर येत आहेत. तंबाखूच्या सेवनामुळे डोके आणि मानेच्या कॅन्सरचे प्रमाण गतीने वाढत आहे. लक्षणे दिसताच उपचार केल्यास उपचार संभव आहे. देशात ५७ टक्के पुरुष तर ११ टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. धक्कादायक म्हणजे, १२ व्या वर्गात जाण्यापूर्वी २० टक्के युवा तंबाखूच्या जाळ्यात अडकतात. अनेकांना या रोगाची माहिती असतानाही वेळीच त्याच्यावर उपचार करीत नाही. आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये या रोगावर उपचार नाही. या रोगाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. विदर्भात केमोथेरपीपासून रेडिएशनच्या सोयीगुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेपासून केमोथेरपी, रेडिएशनच्या सोयी तीन शासकीय रुग्णालयांसह दोन चॅरिटेबल केंद्र व अनेक खासगी केंद्रांवर उपलब्ध आहेत. विदर्भातील डॉक्टरांना आपले काम लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. तिकडे १० रुग्ण पाहून त्याची चर्चा केली जाते, येथे १०० रुग्ण पाहूनही चर्चा होत नाही. चर्चा होणे आवश्यक आहे, असेही डॉ. कापरे म्हणाले. तंबाखूवर प्रतिबंध लागावाडॉ. अभिषेक वैद्य म्हणाले, राज्यात गुटख्यावर प्रतिबंध आहे, परंतु तंबाखूवर नाही. तंबाखू सहज उपलब्ध होत असल्याने याच्या व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. परिणामी कॅन्सरच्या रुग्णातही वाढ होत आहे. विशेषत: तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. तोंड न उघडणे, आवाजात बदल होणे, मानेवर सूज येणे, दात पडणे आदी लक्षणे डोके व मानेच्या कॅन्सरची आहेत. डॉ. आर. रवी म्हणाले, मानेवर सूज आलेली असेल, तोंडात अल्सर झाला असेल तर याची तपासणी होणे आवश्यक आहे. ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात. म्युटेशनमुळे हा कॅन्सर असू शकतो. यावेळी कार्यक्रमात डॉ. राजू खंडेलवाल, डॉ. प्रणय टावरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संचालन डॉ. रवी यांनी केले तर आभार अ‍ॅड. मोकादम यांनी मानले. (प्रतिनिधी)