शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

घर बांधायचे कसे

By admin | Updated: May 9, 2014 02:00 IST

स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. हौसेला मोल नसते, अशी म्हण असली तरी प्रत्येक व्यक्ती आपल्या ऐपतीप्रमाणे घर बांधत असतो.

 

महागाईची झळ : खिशाला कात्री -

मजुरीही वाढली

 
 

मोरेश्‍वर मानापुरे■ नागपूर
स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. हौसेला मोल नसते, अशी म्हण असली तरी प्रत्येक व्यक्ती आपल्या ऐपतीप्रमाणे घर बांधत असतो. मात्न, आजच्या वाढत्या महागाईच्या काळात सामान्यांचे तर घर बांधण्याचे स्वप्न हे आता स्वप्नच होऊन बसले आहे. लोखंड ४५ हजार रु. टन
मागणीनुसार लोखंडाच्या किमतीत कमी जास्त होतात. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा किमती दीडपटीने वाढल्या आहेत. ३0 रुपये किलोच्या तुलनेत किंमत ४५ रुपये आहे. डायमीटरनुसार किमती २-३ रुपयेकमीजास्त असते. सध्या लोखंडाला मागणी कमी आहे. गिट्टी ६ हजार रु. ट्रक
क्युबिक फूटमध्ये मिळणार्‍या गिट्टीचे दर अल्पसे वाढले आहेत. गेल्यावर्षीच्या ५५00 रुपये ट्रकच्या तुलनेत यंदा दर ६ हजारावर (२४ रु. क्युबिक फूट) गेले आहेत. सुरू असलेले बांधकाम आणि मागणीनुसार विक्रेते गिट्टीचे दर ठरवितात. सिमेंट
२७ हजारात १00 बोरी
सिमेंटकंपन्या एकमेकांशी हातमिळवणी करून दर वाढवितात. मागणी वाढताच दर आठवड्याला प्रति बोरी ५ रुपये वाढविण्याचे धोरण असते. सध्या ठोक दर २७0 रुपये (किरकोळ ३00 रु.) असून गेल्यावर्षी २३0 रुपयांच्या आसपास होते. विटा हजार ६५00 रु.
विटांचा प्रति वीट हिशोब पाहिल्यास यंदा दर साडेसहा रुपयांवर गेले आहे. गेल्यावर्षी साडेचार रुपये होता. मध्यंतरी पावसामुळे मातीच्या कच्चा विटा खराब झाल्या, शिवाय कामगारांची रोजी वाढली. सध्या फ्लाय अँशच्या पांढर्‍या विटा विक्रीस आहेत. रेती ६,८00 रु. ट्रक
गेल्यावर्षीच्या तुलनेत रेतीचे दर दीडपट झाले आहेत. गेल्यावर्षी ४ हजार रुपये ट्रक (१६ रु. क्युबिक फूट) दर या वर्षी ६ हजार ८00 रुपयांवर (२६ रु. क्युबिक फूट)गेले आहेत. वर्षभरात एवढी दरवाढ हे एक कोडंच आहे. आकारानुसार ट्रकचे दर आहेत.

बांधकामात कुशल कामगार महत्त्वपूर्णअसतात. त्यांची मजुरीही दीडपटीने वाढली आहे. सध्या कुली २५0 रुपये तर महिला २00 रुपये रोजी घेतात. शिवाय मिस्त्री ४00 ते ५00 रुपयांपर्यंत मागतात. स्वस्त धान्य योजनेने मजूर कामावर येत नाहीत. बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण असतानाही घरांच्या किमती आकाशाला भिडल्याची लोकांची ओरड सत्य आहे. जमिनीच्या किमती आणि घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य आणि सजावटीच्या वस्तू महागल्या आहेत. रेती, गिट्टी, लोखंड, सिमेंट, विटा आणि मजुरीही दीडते दोन पटीने वाढली आहे. बिल्डर्सला घर बांधण्याचा अनुभव असल्याने परिस्थिती पाहून तो कच्च्या साहित्याची खरेदी करतो आणि बिल्डिंग उभी करतो. हे ज्ञान स्वतंत्रघर बांधणार्‍यांना नसल्याने त्याला बर्‍याच अडचणी येतात. घर बांधताना ठेकेदाराची मर्जीचालत नाही. मजूरच सर्वकाही असतो. त्यामुळे अनेकांना वेळेत घर बांधणे कठीण असते. कच्च्या साहित्याचे वाढलेले दर आणि विविध अडचणींवर मात करताना घर बांधायचे कसे, असा सवाल आहे.