शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पोलिसांचा उपराजधानीत हैदोस

By admin | Updated: May 12, 2014 01:05 IST

स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांना लुटणार्‍या टोळीने उपराजधानीत हैदोस माजविला आहे. या टोळीने गेल्या चार महिन्यात १६ लोकांना लुटले आहे.

नागपूर : स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांना लुटणार्‍या टोळीने उपराजधानीत हैदोस माजविला आहे. या टोळीने गेल्या चार महिन्यात १६ लोकांना लुटले आहे. वाढलेल्या या घटनांमुळे चिंतित वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी आपल्या कर्मचार्‍यांना फटकारल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून ही टोळी शांत आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस असल्याचे सांगून लुटण्याच्या घटना शहरात दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. आरोपी पायी किंवा बाईकवर येतात. एकट्यादुकट्या पायी जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना ते हेरतात आणि त्यांना आपण पोलीस असल्याचे सांगतात. हातातील व गळ्यातील दागिने काढून ठेवायला सांगतात. ते दागिने एका पुडीत बांधून देण्याचे प्रयत्न करीत दागिने घेऊन फरार होतात. सूत्रानुसार बोगस पोलीस बनून लुटणारी स्थानिक आणि बाहेरची टोळी आहे. बाहेरची टोळीसुद्धा स्थानिकांच्या मदतीनेच लुटपाट करते. बाहेरच्या टोळीमध्ये दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील सदस्य आहेत. त्यांचे स्थानिक गुन्हेगार, आॅटोचालक आणि पोलीस कर्मचार्‍यांशी संबंध असतात. स्थानिक साथीदारांच्या मदतीमुळे त्यांना पोलीस आणि शहराबद्दलची माहिती मिळत असते. अनुकूल परिस्थिती असताना ही टोळी शहरात प्रवेश करते. या टोळीतील सदस्य दोन किंवा तीन सदस्यांची एक टोळी तयार करून सावज शोधण्यास निघतात. दागिने घालून असलेला ज्येष्ठ नागरिक दिसताच त्याला थांबवतात. यापैकी एकजण देखरेख ठेवतो तर दुसरा त्याला फसवित असतो. दीड ते दोन मिनिटात ते दागिने घेऊन फरार होतात. त्यांच्या बोलण्याने अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाला सुरुवातीला काहीच कळत नाही. काही वेळानंतर किंवा घरी आल्यावरच दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात येते. बाहेरची टोळी मदत करणार्‍या स्थानिक टोळीला दागिन्याच्या किमतीच्या आधारावर हिस्सा देते. दोन्ही टोळींमध्ये योग्य समन्वय असल्याने ही टोळी पोलिसांच्या हाती लागलेली नाही. एखादवेळी लुटलेल्या दागिन्याच्या हिस्सेवाटणीवरून वाद झाल्याने सापडण्याची भीती असते. अशाच प्रकारच्या एका वादातून १० महिन्यांपूर्वी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली होती. परंतु पोलिसांनी त्या टोळीकडूनही वसुली करून तिला सोडून दिले होते. गुन्हे शाखेकडूनही त्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. याचप्रकारे स्थानिक टोळीमध्ये निलंबित किंवा बरखास्त पोलीस कर्मचारी आणि गुन्हेगार सामील असतात. पोलिसांचा मेंदू असल्याने त्यांचे काम आणखी सोपे होते. एकवेळ बोगस पोलिसांच्या टोळीमध्ये इराणी गँगची दहशत होती. पोलिसांची नजर पडल्याने ही टोळी दुसर्‍या क्षेत्रात सक्रिय झाली आहे. ही टोळी शहर आणि ग्रामीण भागाात मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.