शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मनीष गृहनिर्माण सहकारी संस्थेला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:08 IST

नागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश दिल्यामुळे मनीष गृहनिर्माण सहकारी संस्थेला ...

नागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश दिल्यामुळे मनीष गृहनिर्माण सहकारी संस्थेला जोरदार दणका बसला.

तक्रारकर्त्या ग्राहकाला त्याचे ६१ हजार ५०० रुपये व त्यावर १३ ऑक्टोबर २००३ पासून १५ टक्के व्याज किंवा त्याने खरेदी केलेल्या भूखंडाची वर्तमान रेडीरेकनरनुसार किंमत, या दोनपैकी जास्त असलेली रक्कम अदा करण्यात यावी, असा आदेश आयोगाने संस्थेला दिला. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही संस्थेनेच द्यायची आहे. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थेला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे.

किशोर तेलंग असे ग्राहकाचे नाव असून त्यांच्या तक्रारीवर आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी निर्णय दिला. तक्रारीनुसार, तेलंग यांनी संस्थेच्या मौजा बेलतरोडी येथील ले-आउटमधील १५०० चौरस फुटांंचा भूखंड ६१ हजार ५०० रुपयांत खरेदी केला आहे. ३ जुलै २००२ रोजी त्याचा करार झाला आहे. त्यानंतर तेलंग यांनी संस्थेला भूखंडाची संपूर्ण रक्कम अदा केली. तसेच, रस्ते बांधण्यासाठी पाच हजार रुपये अतिरिक्त दिले. संस्थेने जानेवारी-२००३ पर्यंत भूखंडाचे विक्रीपत्र करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. तेलंग यांना केवळ ताबापत्र करून देण्यात आले. दरम्यान, तेलंग यांनी संस्थेला कायदेशीर नोटीस बजावली. संस्थेने ती नोटीस स्वीकारली नाही. परिणामी, तेलंग यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. ग्राहक आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता हा निर्णय दिला.

------------------

हा तर संस्थेचा अनुचित व्यापार

संस्थेने तक्रारकर्त्यासोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला, असे परखड निरीक्षण आयोगाने निर्णयात नोंदवले. तक्रारकर्त्याने भूखंडाची संपूर्ण रक्कम अदा केली आहे. त्यानंतरही त्यांना भूखंडाच्या उपभोगापासून वंचित राहावे लागत आहे. संस्थेला ले-आउटसाठी विविध परवानग्या घेणे शक्य नव्हते तर, तक्रारकर्त्‍याला अडचण कळवून त्‍यांची संपूर्ण रक्‍कम व्‍याजासह परत करणे आवश्‍यक होते. परंतु, संस्थेने तसे केले नाही. संस्था तक्रारकर्त्‍याकडून स्वीकारलेल्या पैशांचा आजतागायत वापर करीत आहे. ही कृती अनुचित व्यापारामध्ये मोडते, असे आयोगाने नमूद केले.