शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
5
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
6
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
7
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
8
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
9
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
10
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
11
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
14
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
15
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
16
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
17
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
18
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
19
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
20
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाच्या संवर्धनाला हेरिटेजचा अडसर

By admin | Updated: May 9, 2014 02:17 IST

नागपूरच्या इतिहासात भोसले घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजे रघुजी महाराजांनी बारा बलुतेदारांना एकत्र करून नागपूर शहर बसविले, शहराला विकसित केले.

मंगेश व्यवहारे ■ नागपूर
नागपूरच्या इतिहासात भोसले घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजे रघुजी महाराजांनी बारा बलुतेदारांना एकत्र करून नागपूर शहर बसविले, शहराला विकसित केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी राजधानी व महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर उपराजधानीचा दर्जा नागपूरला मिळाला. मात्र, नागपूरचे प्रशासन राजाचा सन्मान करू शकले नाही. आज राज्याच्या समाधीची दुरवस्था झाली आहे. या समाधीचे संरक्षण व्हावे म्हणून भोसले घराणे प्रयत्नरत आहे. मात्र हेरिटेजचा अडसर असल्याने, या समाधींचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकत नाही.
भोसले राजघराण्याचे स्वत:चे घाट आहे. त्याला राजघाट संबोधण्यात येते. या राजघाटावर भोसले घराण्यातील राणी काशीबाई सती गेल्या होत्या. त्यांचे समाधी मंदिर येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे हे राजघाट काशीबाई मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे.
नवसाला पावतात म्हणून अनेकांची श्रद्धा आहे. या राजघाटावर राजे रघुजी प्रथम, द्वितीय, तृतीय, त्यांच्या राण्या, भोसले घराण्याचे खासमखास असलेल्या लोकांची समाधी आहे. या समाध्यांचे बांधकाम अतिशय जुने आहे. त्यामुळे राजघाट परिसराची नोंद हेरिटेजमध्ये करण्यात आली आहे. राजघाट हा भोसल्यांच्या मालकीच्या जागेवर असला तरी, हेरिटेजमध्ये आल्याने त्यांचे रक्षण ते करू शकत नाही.
नागपूर महापालिकेंतर्गत येणार्‍या जुन्या वास्तूंचे जतन व्हावे, यासाठी हेरिटेज कमिटी तयार करण्यात आली होती. मात्र हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून या स्थळांचा कुठलीही विकास करण्यात आला नाही. राजघाटातील सर्व समाधींचे बांधकाम पुरातन पद्धतीचे आहे. ते जीर्ण झाले आहे. काही समाध्या खचलेल्या आहे, तुटलेल्या आहे. भोसले घराण्याचे वंशज समाधीच्या दुरस्तीला तयार असले तरी, बांधकाम करायचे असेल तर हेरिटेज कमिटीची परवानगी आवश्यक आहे.
मात्र शहरात हेरिटेज कमिटीच अस्तित्वात नसल्याने, ऐतिहासिक वारसा नष्ट होत आहे. मनपाच्या नगररचना विभागात हेरिटेज समितीच्या संदर्भात विचारणा केली असता, काही वर्षांपूर्वी ही समिती बरखास्त झाली असल्याचे सांगण्यात आले.

पर्यटन क्षेत्र होईल यादृष्टीने प्रयत्न करावे
या स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने याचे अस्तित्व जपले पाहिजे. लोकांना या स्थळाची माहिती व्हावी म्हणून या स्थळाचा विकास करणे गरजेचे आहे. हे स्थळ पर्यटन क्षेत्र होईल, यादृष्टीने मनपाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दत्ता शिर्के, सचिव, युवा चेतना मंच

मालक असूनही संरक्षणापासून वंचित
राजघाट हे नागपूरचे ऐतिहासिक वैभव आहे. या घाटावर भोसले घराण्याचे सर्व राजा, राणी यांच्या समाधी आहेत. बांधकामही जुन्या पद्धतीचे असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. भोसले घराणे या जागेचा आजही टॅक्स भरतात; मात्र विकास करू शकत नाही. आज या घाटाला संरक्षण भिंत नाही. घाटाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. अवैध कामे येथे होतात. हेरिटेज कमिट्या निव्वळ नावापुरत्या असून, त्यांच्यामुळेच नागपूरचे ऐतिहासिक वैभव नष्ट होत आहे.
राजे मुधोजी भोसले, भोसलेंचे १३ वे वंशज