शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण जयस्तंभ

By admin | Updated: July 11, 2014 01:22 IST

देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण असलेला ‘जयस्तंभ’ रस्ते वाहतुकीला अडचण ठरत असल्याने हटविण्यात आला. रेल्वे स्टेशन चौकालगतच तो नव्याने उभारण्यात येणार असून

नव्याने उभारणार : मूळ स्वरूप कायम राहणार नागपूर : देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण असलेला ‘जयस्तंभ’ रस्ते वाहतुकीला अडचण ठरत असल्याने हटविण्यात आला. रेल्वे स्टेशन चौकालगतच तो नव्याने उभारण्यात येणार असून या ऐतिहासिक स्मारकाचे मूळ स्वरूप मात्र कायम ठेवण्यात येणार आहे. ‘शहिदो की चितोओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालो का, यही बाकी निशां होगा’ जेव्हा-जेव्हा शहिदांची आठवण होत असते, ही ओळ आपसूकच ओठांवर येते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकं शहीद झालीत. या शहिदांच्या स्मृतीत प्रत्येक शहरांमध्ये शहीद स्मारक उभारण्यात आले. त्याचधर्तीवर भारताच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून देशातील प्रत्येक शहरात ‘जयस्तंभ’ उभारण्यात आले होते. नागपुरात रेल्वे स्टेशन चौकात रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयासमोर (डीआरएम आॅफिस) १५ आॅगस्ट १९४७ रोजी ‘जयस्तंभ’ उभारण्यात आले. जयस्तंभ हे केवळ एक स्मारक नव्हे तर ते देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. या स्तंभाच्या चारही बाजूंनी अशोक चक्र अंकीत होते. मध्य प्रदेशचे तत्कालीन पहिले मुख्यमंत्री पं. रविशंकर शुक्ला आणि गृहमंत्री द्वारकाप्रसाद मिश्रा यांच्या हस्ते जयस्तंभचे लोकार्पण करण्यात आले होते. काही वर्षानंतर त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. परंतु कालांतराने या जयस्तंभाची प्रचंड उपेक्षा करण्यात आली. जयस्तंभच्या चारही बाजूंनी जाहिरातीचेच फलक अधिक लागलेले राहायचे. स्तंभाजवळ असलेले पाण्याचे फवारे बंद पडले. अशोक चक्रही तुटून पडले होते. कम्पाऊंडच्या आत दगड माती जमा झाली होती. दरम्यान नागपूर त्रिशताब्दी वर्षात नागपुरातील रस्ते रुंदीकरण करण्यात आले. तेव्हा जे पुतळे वाहतुकीसाठी अडथळा ठरत होते ते हटवून त्याच चौकात नवीन स्वरूपात बसविण्यात आले. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीजींचा पुतळा आणि झांशी राणी चौकातील राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा त्याच चौकात रोडला लागून वसविण्यात आले. परंतु रेल्वे स्टेशन चौकातील ‘जयस्तंभ’ मात्र तसाच राहिला. रेल्वे स्टेशन चौक हा अतिशय वर्दळीचा चौक आहे. रामझुल्याचे कामही जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पुलावरून येणारया वाहतुकीचा विचार केल्यास जयस्तंभ वाहतुकीसाठी अतिशय अडचणीचा ठरत होता. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने ‘जयस्तंभ’ हटविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री स्तंभ हटविण्याची कारवाई करण्यात आली. नागपुरातील इतर पुतळे ज्या पद्धतीने हटवून त्याच चौकात रस्त्यालगत उभारण्यात आलेत, त्याच धर्तीवर जयस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी महापौर प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्वात पाहणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबेसुद्धा हजर होते. रेल्वे स्टेशन चौकातच आर्मीच्या आॅफिसला लागून महापालिकेच्या जुन्या आॅक्ट्रॉयची जागा आहे. या जागेवर जयस्तंभ लवकरच नव्याने उभारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)