शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांना हायकोर्टाचा समन्स

By admin | Updated: June 18, 2016 02:29 IST

सिव्हिल लाईन्सस्थित मीठा नीम दर्ग्यापुढील रस्ता दुभाजकावर मंडप उभारण्यात आला होता.

मीठा निम दर्ग्यापुढील अतिक्रमणाचे प्रकरणनागपूर : सिव्हिल लाईन्सस्थित मीठा नीम दर्ग्यापुढील रस्ता दुभाजकावर मंडप उभारण्यात आला होता. हा मंडप उभारतानाच कारवाई केली नाही म्हणून महानगरपालिका आयुक्त व धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी समन्स बजावून स्पष्टीकरण सादर करण्यासाठी २३ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिलेत. तत्पूर्वी मनपा अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली.याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. हे प्रकरण गुरुवारी सुनावणीसाठी आले असता न्यायालयाने हा मंडप शुक्रवारी सकाळी १०.३० वाजतापर्यंत हटविण्याचे निर्देश दिले होते. तसेच, या निर्देशाचे पालन न झाल्यास मनपा व पोलीस आयुक्तांवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही वेळातच मनपा व पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा मीठा नीम दर्ग्यापुढे पोहोचला. अधिकारी व दर्गा ट्रस्टने हा विषय सामंजस्याने हाताळून वादग्रस्त मंडप रात्री हटविला. शुक्रवारी ही माहिती न्यायालयाला देण्यात आली. यानंतर न्यायालयाने हा मंडप उभारूच कसा देण्यात आला असा प्रश्न मनपाला विचारला. दरम्यान, १६ सप्टेंबर २००९ व २५ फेब्रुवारी २०१५ रोजीचे आदेश न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या आदेशांमध्ये न्यायालयाने अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले आहे. तसेच, मनपा व पोलीस आयुक्तांनी या आदेशाचे काटेकोर पालन केले जाईल, अशी हमी न्यायालयाला दिली होती. असे असताना रस्ता दुभाजकावर मंडप उभारण्यात आला ही बाब न्यायालयाला रुचली नाही. उल्लेखनीय म्हणजे, मीठा नीम दर्गा मनपा व वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयापासून अगदी जवळ आहे. वादग्रस्त मंडप उभारणे सुरू असताना सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ५ जून रोजी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्तांना पत्र लिहिले होते. त्यात मंडप हटविण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. यानंतर ८ जून रोजी पोलीस उपायुक्तांनी मनपा आयुक्तांना असेच पत्र सादर केले. परंतु, त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. या दोन्ही पत्राची माहिती न्यायालयाला देण्यात आली. या एकूणच तथ्यांचा विचार करता न्यायालयाने मनपा आयुक्त व धरमपेठ झोनचे सहायक आयुक्तांना समन्स बजावला. दोन्ही अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा अवमान केला हे तथ्यांवरून दिसून येत असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)अशी आहे याचिकारोडवरील अतिक्रमणासंदर्भात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊन रोडवर धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय इत्यादी कोणत्याही कार्यक्रमानिमित्त मंडप, कमानी, स्वागतद्वारे इत्यादी बाबी उभारण्यास परवानगी देऊ नये असे बजावले आहे. असे असताना रोडवर अस्थायी अतिक्रमण करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. अधिकारी आदेशाचे पालन करीत नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.