हायकोर्ट : नितीन गडकरी यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 07:59 PM2019-07-25T19:59:32+5:302019-07-25T20:00:41+5:30

लोकसभेच्या नागपूर मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तीन निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या प्रकरणात न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांनी गुरुवारी गडकरी व भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून २३ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.

High Court: Notice to Nitin Gadkari | हायकोर्ट : नितीन गडकरी यांना नोटीस

हायकोर्ट : नितीन गडकरी यांना नोटीस

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीला आव्हान

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या नागपूर मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तीन निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या प्रकरणात न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांनी गुरुवारी गडकरी व भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून २३ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.
याचिकाकर्त्यांमध्ये काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे व मतदार मो. नफिस खान यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा गडकरी यांना मिळाला. तसेच, निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळे गडकरी यांची निवडणूक रद्द करून नागपूर मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अभियान बाराहाते, अ‍ॅड. बरुणकुमार तर, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: High Court: Notice to Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.