शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेला हायकोर्टाची नोटीस

By admin | Updated: February 16, 2017 02:45 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्टच्या रिट याचिकेवर सुनावणी केल्यानंतर नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्टच्या रिट याचिकेवर सुनावणी केल्यानंतर नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन व महानगरपालिका यांना नोटीस बजावून २७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. ही याचिका जमिनीसंदर्भात आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील माहितीनुसार, पोद्दारेश्वर राम मंदिराच्या बाजूला मौजा बर्डी येथे ट्रस्टची सर्व्हे क्र. २३५४ (६३४.५० चौरस मीटर) व २३५५ (९४२५.८० चौरस मीटर) ही जमीन आहे. १९७२ मध्ये मनपाने ट्रस्टची परवानगी न घेता सर्व्हे क्र. २३५५ या जमिनीवर स्वत:चे नाव चढवले. या ठिकाणी ट्रस्टने बांधलेल्या गाळ्यांमध्ये १३ भाडेकरू १९३४ पासून पूजेचे साहित्य, पेढे, खोवा इत्यादी वस्तू विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. ते मनपाला नियमित कर देत आहेत. असे असताना मेट्रो रेल्वेसाठी ही जमीन बळजबरीने घेतली जात आहे. ट्रस्टला नोटीस व मोबदला न देता ही कारवाई केली जात आहे. याविरुद्ध मनपा व मेट्रो रेल्वेला निवेदन सादर करण्यात आले होते. पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सुधीर महाजन यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)