शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात गांजाचा पुरवठा

By admin | Updated: April 29, 2015 02:44 IST

चपलांमध्ये गांजा लपवून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुरवठा करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.

नागपूर : चपलांमध्ये गांजा लपवून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुरवठा करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. सोमवारी अजनी चौकातील माऊंट कार्मेल शाळेजवळ तिघांना गांजासह ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून ५२,३२० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी अमोल राजेश बोदेले (१८) रा. धरमपेठ बुद्ध विहार, निशिकांत भीमराव टेमरे (३०) रा. जयनगर पांढराबोडी व अक्षय हनुमंत बुत्तलवार (१९) रा. अंबाझरी हिलटॉप आहेत. हे तिघेही आरोपी सोमवारी दुपारी दुचाकी वाहनावर जात असताना, पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता, दुचाकीच्या डिक्कीतून २४८ ग्राम गांजा मिळाला. पोलिसांना अक्षयच्या चप्पलमध्येही गांजा असल्याचा संशय आला. चप्पल कापून बघितली असता त्यातून १२५ ग्राम गांजा मिळाला. पोलिसांनी तिघांनाही अटक करून, अधिक चौकशी केली असता, कारागृहात गांजाचा पुरवठा करण्यात येत असल्याचा खुलासा त्यांनी केला. हे आरोपी या व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती आहे. कारागृहाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने गांजाचा पुरवठा करण्यात येत होता. या कारवाईमुळे कैद्याच्या पलायनानंतरही कारागृहाची अवस्था सुधारणार नाही, असेच दिसतेय. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, निरीक्षक पंडितराव सोनवणे, हवालदार गजानन ठाकूर, शिपाई गणेश घुगुलकर, किशोर महंत, नितीन तिवारी, सतीश पाटील, नरेश शिंगणे व रुबिना यांनी केली. (प्रतिनिधी)