शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात उष्णतेची लाट :

By admin | Updated: May 15, 2016 02:23 IST

हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात शनिवारी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

चंद्रपूर ४६ नागपूर ४५.६ अंश नागपूर : हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात शनिवारी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर प्रदेशातील बांदा येथील ४७ अंश सेल्सिअस तापमानाखालोखाल विदर्भ तापलेला आहे.चंद्रपूर सर्वांत ‘हॉट’ राहिले असून येथील तापमानाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. यापाठोपाठ ब्रह्मपुरी येथेही ४६ अंश आणि नागपूर उपराजधानीत ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाचा हा उच्चांक आहे. यापूर्वी मागील महिन्यात चंद्रपूर येथील तापमान ४५.६ अंशावर गेले होते. शुक्रवारी चंद्रपूर येथील तापमान केवळ ४४ अंश सेल्सिअस होते. परंतु शनिवारी एकाच दिवसात २ अंश सेल्सिअसने ते वर चढले. हवामान खात्याने यापूर्वीच मे महिन्यातील तापमान ४७ अंशापर्यंत पोहोचण्याचे संकेत दिले आहेत. चंद्रपुरात शनिवारी सकाळी ७ वाजतापासून उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले. दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वेगाने वाढ झाली. मे महिन्याचा दुसरा आठवडा चंद्रपूरकरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. अमरावतीकरांना ४५.२ डिग्री सेल्सिअस तापमानाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वर्धेचे तापमान ४५.५ अंशावर पोहोचल्याची नोंद करण्यात आली. यंदाही एप्रिलमध्ये ४५ अंशावर पोहोचणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला होता.अवकाळी पावसामुळे पारा ३६ पर्यंत खाली आला होता. यवतमाळात ४४ अंश इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. गोंदियात तापमान शनिवारी ४४.८ अंशावर पोहोचले. भंडाऱ्यात ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. शुक्रवारला तापमान वाढून ४१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)चंद्रपूर @ ४६ दिसत होता. गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वेगाने वाढ झाली. मे महिन्याचा दुसरा आठवडा चंद्रपूरकरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. अमरावतीकरांना ४५.२ डिग्री सेल्सिअस तापमानाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वर्धेचे तापमान ४५.५ अंशावर पोहोचल्याची नोंद करण्यात आली. यंदाही एप्रिलमध्ये ४५ अंशावर पोहोचणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला होता.अवकाळी पावसामुळे पारा ३६ पर्यंत खाली आला होता. यवतमाळात ४४ अंश इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. यापूर्वी एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील कमाल तापमान ४३.६ अंशांपर्यंत गेले होते. त्यानंतर अवकाळी पावसामुळे पारा ४० अंशाखाली घसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु शनिवारी पुन्हा ४४ अंश इतके कमाल, तर २७.२ अंश इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.गोंदियात एरवी जास्तीत जास्त ४२ ते ४३ अंशापर्यंत राहणारे तापमान शनिवारी चक्क ४४.८ अंशावर पोहोचले. त्यामुळे उन्हाच्या तीव्र चटक्यांनी गोंदियावासी होरपळून निघाले. भंडाऱ्यात ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. शुक्रवारला तापमान अचानक वाढून ४१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)विदर्भातील तापमान अंश सेल्सि.शहर कमाल किमाननागपूर४५.६२६.५अकोला४४.२३०.७ अमरावती ४३.२२७.२बुलडाणा ४१.३२९ ब्रम्हपुरी ४६३१.४चंद्रपूर ४६३१.८गोंदिया ४४.८२९.६वर्धा ४५.५ २९.५ यवतमाळ ४४२७