शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

करिष्मा कपूरप्रकरणी १८ रोजी सुनावणी

By admin | Updated: February 11, 2016 03:25 IST

चित्रपट अभिनेत्री करिष्मा कपूरविरोधातील एका दिवाणी दाव्याच्या प्रकरणाची सुनावणी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. एल. दीक्षित यांच्या न्यायालयात १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

नागपूर : चित्रपट अभिनेत्री करिष्मा कपूरविरोधातील एका दिवाणी दाव्याच्या प्रकरणाची सुनावणी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. एल. दीक्षित यांच्या न्यायालयात १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्रकरण असे की, निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने २५ जानेवारी २०१३ रोजी उमरेड मार्गावरील निर्मलनगरीत करिष्मा कपूर ऊर्फ लोलो हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निर्मल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी या कार्यक्रमासाठी करिष्माला अग्रीम रक्कमही अदा केली होती. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी कोणतीही पूर्वसूचना न देता ती कार्यक्रमाला अनुपस्थित राहिली. त्यामुळे आयोजकाचे मोठे नुकसान झाले. २ एप्रिल २०१३ रोजी निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने प्रमोद मानमोडे यांनी अ‍ॅड. श्रद्धानंद भुतडा यांच्यामार्फत करिष्मा कपूर, मॅट्रिक्स इंडिया एन्टरटेन्मेंट, इशिता ठक्कर, युवराज एन्टरटेन्मेंट मुंबई आणि सिद्धार्थ तिवारीविरुद्ध ३५ लाखांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारा दिवाणी दावा दाखल केला होता. १८ रोजी या प्रकरणी सुनावणी होऊन प्रारंभी प्रमोद मानमोडे आणि नंतर अभिनेत्री करिष्माचे बयाण होणार आहे. करिष्मा ही आपल्या वकिलाच्या मार्फतही न्यायालयात आपले लिखित बयाण सादर करू शकते. (प्रतिनिधी)