केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय नागपुरातच राहणार

By Admin | Updated: August 26, 2016 02:59 IST2016-08-26T02:59:12+5:302016-08-26T02:59:12+5:30

५८ वर्षांपूर्वी नागपुरात स्थापन झालेले केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

The headquarters of the Central Board of Labor Education will remain in Nagpur | केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय नागपुरातच राहणार

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय नागपुरातच राहणार

केंद्रीय श्रममंत्र्यांचे आश्वासन : कर्मचाऱ्यांची घेतले आंदोलन मागे
नागपूर : ५८ वर्षांपूर्वी नागपुरात स्थापन झालेले केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी याचा जोरदार विरोध करीत, आंदोलन सुरू केले होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश आले असून, केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी हे मुख्यालय नागपुरातच राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
याविषयावर ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बळ दिले होते.
केंद्रीय सरकारी कर्मचारी कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. एम. राघवैया यांच्या नेतृत्वात केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांची दिल्ली येथे भेट घेण्यात आली. यावेळी कॉन्फेडरेशनचे महामंत्री एन. एस. पिल्लई, केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजेश देशमुख, महामंत्री राजेश मिश्रा, अमरजित शर्मा, अविनाश चंद्र, राजेश्वर प्रसाद आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली.
संघटनेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यालय नागपुरातच ठेवण्याचे आश्वासन दिले.
मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे नागपूर मुख्यालयात कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, इंटकचे मुकुंद मुळे, रणजितसिंग बघेल यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)

Web Title: The headquarters of the Central Board of Labor Education will remain in Nagpur