शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये ‘एचसीएल’ची ५० एकर जागेची खरेदी

By admin | Updated: September 7, 2016 02:54 IST

आयटी क्षेत्रातील नामांकित हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेडने (एचसीएल) मंगळवारी मिहान-सेझमध्ये ५० एकर जागा खरेदीचा लीज करार केला.

लीज करारावर स्वाक्षरी : आयटी कंपन्यांची रेलचेलनागपूर : आयटी क्षेत्रातील नामांकित हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेडने (एचसीएल) मंगळवारी मिहान-सेझमध्ये ५० एकर जागा खरेदीचा लीज करार केला. या करारामुळे मिहानच्या विकासात पुन्हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.स्कील डेव्हलपमेंट सेंटरची उभारणीमंगळवारी सायंकाळी नव्याने करण्यात आलेल्या करारावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील आणि एचसीएलचे उपाध्यक्ष (विधी) विनीत वीज यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या जागेवर एचसीएल स्कील डेव्हलपमेंट सेंटर उभारणार आहे. यापूर्वी एचसीएलने मिहान-सेझमध्ये जागा खरेदीचा करार केला होता. पण जागतिक मंदी आणि तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे पूर्णपणे जागेचा ताबा घेतला नव्हता. पण आता नव्या करारामुळे या कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.मिहानमध्ये मोठ्या आयटी कंपन्या कार्यरतभारतातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएस मिहान-सेझमध्ये आधीच कार्यरत आहे. याशिवाय इन्फोसिसने १४३ एकर जागेवर बांधकाम सुरू केले आहे. तसेच टेक महिन्द्रचे बांधकाम जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. १० अन्य आयटी कंपन्यांनी काम सुरू केले आहे. काहीच दिवसांपूर्वी पतंजलीने फूडपार्कमध्ये २३० एकर जागा खरेदी केली आहे. भूमिपूजन १० सप्टेंबरला होणार आहे. ही मिहान-सेझसाठी आनंदाची बाब आहे.करारावेळी ‘एमएडीसी’चे तांत्रिक सल्लागार एस.व्ही. चहांदे, मुख्य अभियंते एस.के. चॅटर्जी, वरिष्ठ अभियंत्या रजनी लोणारे, उपजिल्हाधिकारी अशोक चौधरी, कार्यकारी अभियंते ललित इंगळे, विपणन अधिकारी अतुल ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी आणि वीज सल्लागार केशव इंगोले उपस्थित होते. पाटील यांनी मंगळवारी मिहान-सेझमधील पतंजलीच्या टीसीएस कॅम्पससमोरील जागेची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना भूमिपूजनासाठी येणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)