शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

फाशी सकाळी ६ की ७ वाजता?

By admin | Updated: July 30, 2015 02:43 IST

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला आज गुरुवारी सकाळी ६ की ७ वाजता फाशी देण्यात येणार, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

राहुल अवसरे  नागपूरमुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला आज गुरुवारी सकाळी ६ की ७ वाजता फाशी देण्यात येणार, असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात सकाळी ७ वाजता फाशी देण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी विधी आयोगाने कारागृह नियमावलीचा आणि फौजदारी प्रक्रिया संहितेचा हवाला देऊन मे ते आॅगस्ट या महिन्यात दिली जाणारी फाशी सकाळी ६ वाजताच द्यावी, असा उल्लेख आपल्या अहवालात केलेला आहे. मात्र, फाशीची ही संपूर्ण प्रक्रिया जास्तीत जास्त ४० मिनिटात नियमानुसार पूर्ण करावी लागणार आहे. मृत्युदंडाच्या संदर्भात देशात समान नियम असावेत, यासाठी भारताच्या विधी आयोगाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ आणि कारागृह नियमावलीचा अभ्यास करून मौलिक शिफारशी केल्या. आरोपीला कोणत्या काळात कोणत्या वेळी फाशी दिली जावी, असा त्यात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. विधी आयोगाच्या अहवालाच्या परिच्छेद ८७२ मध्ये वेळेबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात सकाळी ८ वाजता, मार्च, एप्रिल, सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये सकाळी ७ वाजता आणि मे ते आॅगस्टमध्ये सकाळी ६ वाजता फाशी दिली जावी, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसार याकूबला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. कारागृह अधीक्षक, उपअधीक्षक यांनी फाशीच्या कैद्याच्या कोठडीत जाऊन फाशी दिल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीबाबत खात्री करावी, त्याला डेथ वॉरंट वाचून दाखवावा, इच्छा आणि अन्य संदर्भातील विविध दस्तऐवजावर त्याच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात, त्यानंतर अधीक्षकाने फाशी यार्डकडे जावे, उपअधीक्षकाच्या उपस्थितीत फाशी दिली जाणाऱ्या कैद्याचे दोन्ही हात पाठमोरे करकचून बांधले जावे, पायात दंडाबेडी असावी, उपअधीक्षकाच्याच देखरेखीत त्याला फाशी यार्डकडे घेऊन जावे, त्याच्या सभोवताल मुख्य वॉर्डरसह सहा वार्डरचा गराडा असावा, त्यापैकी दोघांनी पुढे, दोघांनी मागे राहावे आणि एकाने त्याचे दोन्ही हात पकडून ठेवावे. फाशी यार्डाच्या ठिकाणी अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्याने अधीच नेमून दिलेल्या आपापल्या जागेवर राहावे. कारागृह अधीक्षकाचा असेल शेरा नागपूर : फाशी देण्यापूर्वी याही ठिकाणी त्याला त्याच्या भाषेत डेथ वॉरंट वाचून दाखविण्यात यावा, त्यानंतर त्याला फाशी देणाऱ्याच्या ताब्यात सोपवावे, वॉर्डरने उचलून त्याला फाशीच्या दोराच्या खाली उभे करावे, त्यानंतर त्याचे दोन्ही पाय घट्ट बांधले जावे, त्याचे डोके आणि चेहरा कॅपने झाकला जावा, त्यानंतर त्याच्या गळ्यात गळफास टाकावा, तो गळ्यात घट्ट असावा, वॉर्डरने फाशी जाणाऱ्या व्यक्तीला सोडताच आणि अधीक्षकाचा इशारा होताच खालची फळी सरकवून त्याला फाशी दिली जावी. जास्तीत जास्त ४० मिनिटात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जावी. अर्धा तासपर्यंत देह फासावर तसाच लटकवत ठेवावा, वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केल्याशिवाय तो खाली उतरवू नये, त्यानंतर कारागृह अधीक्षकाने शिक्षा पूर्ण केली, असा शेरा लिहून आणि स्वाक्षरी करून डेथ वॉरंट परत करावा, असाही उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.