शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यांकनात हलगर्जी; प्राध्यापकांवर कारवाई ?

By admin | Updated: August 24, 2016 03:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान आहे

नागपूर विद्यापीठ : शिस्तपालन समितीकडे प्रकरण पाठविणार, ‘बीएसस्सी’च्या निकालांची डोकेदुखीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान आहे ते ‘बीएसस्सी’च्या चार सत्रांच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल लावण्याचे. प्राध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे २० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी आहे. काही प्राध्यापक तर एकदाही मूल्यांकनासाठी आलेले नसून त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत विद्यापीठाने दिले आहेत. संबंधित प्राध्यापकांची प्रकरणे शिस्तपालन समितीकडे वर्ग करण्यात येतील, अशी माहिती परीक्षा नियंत्रकांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाच्या बहुतांश महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असले, तरी ‘बीएसस्सी’ अभ्यासक्रमाच्या पहिल्या ४ सत्रांच्या २० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडलेले आहे. विज्ञान महाविद्यालयांतील प्राध्यापक नियमितपणे मूल्यांकनाला येत नसल्याने ही स्थिती ओढवलेली आहे. एकीकडे हिवाळी परीक्षांची तयारी सुरू झाली असताना ‘बीएसस्सी’च्या प्रलंबित निकालांमुळे परीक्षा विभागाची दमछाक होत आहे. शिवाय विद्यार्थ्यांचेदेखील नुकसान होत आहे. विद्यापीठाने यासंदर्भात १४२ प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे. परंतु काही प्राध्यापक मूल्यांकनासाठी आलेलेच नाही. अशा प्राध्यापकांवर कारवाई करणे गरजेचे असून शिस्तपालन समितीकडे त्यांची प्रकरणे पाठविण्यात येतील, असे परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)कारवाई केली तरी फटकाचदरम्यान, विद्यापीठातील अनेक अधिकारी विज्ञान महाविद्यालयांतील प्राध्यापकांवर कारवाई करण्याच्या पक्षात नाहीत. अगोदरच विज्ञान शाखेत मूल्यांकनाची बोंब आहे. त्यात कारवाई झाली तर त्याचा फटका विद्यापीठालाच बसणार आहे. याबाबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी सध्या कारवाईपेक्षा विद्यार्थ्यांचे निकाल जास्त महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. मूल्यांकन लवकरात लवकर कसे होईल यावर आमचा भर असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.२९ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर ?विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांचे ८२५ च्या जवळपास निकाल जाहीर केले आहेत. इतर परीक्षांचे निकाल २९ आॅगस्टपर्यंत लावण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. ‘बीएसस्सी’ वगळता इतर निकाल त्या कालावधीत लावण्यात येतील. जर प्राध्यापक हवे त्या प्रमाणात आले तर २९ आॅगस्टपर्यंत ‘बीएसस्सी’चेदेखील बहुतांश मूल्यांकन पूर्ण होईल, असा विश्वास परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांनी व्यक्त केला.संस्थाचालक, प्राचार्यांना विनंतीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महाविद्यालयांकडून प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत मागील आठवड्याात विद्यापीठात प्राचार्यांची बैठकदेखील घेण्यात आली होती. प्राध्यापकांना सर्व कामांतून आठवडाभर दूर ठेवून मूल्यांकनाला पाठविण्यात यावे, अशी विनंती संस्थाचालक व प्राचार्यांना परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.