शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

‘हाफकिन’कडून औषधपुरवठा सहा महिन्यात सुरळीत  : संजय मुखर्जी यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:37 IST

‘हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉपोरेशन लि.’मुळे औषधी, यंत्र सामूग्री खेरीदीत पारदर्शकता आली आहे. पुढील सहा महिन्यात या कंपनीकडून औषधांसह यंत्र सामूग्री पुरवठाही सुरळीत होईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

ठळक मुद्दे सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉपोरेशन लि.’मुळे औषधी, यंत्र सामूग्री खेरीदीत पारदर्शकता आली आहे. पुढील सहा महिन्यात या कंपनीकडून औषधांसह यंत्र सामूग्री पुरवठाही सुरळीत होईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. ते म्हणाले, या सोबतच ‘अ‍ॅण्टी रेबीज’, ‘अ‍ॅण्टी स्नेक व्हेनम’, ‘हिमोफेलिया’ या आजाराचा औषधांसह इतरही महत्त्वाच्या औषधी निर्माण करण्याच्या कार्याला गती देण्यात येईल.‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अ‍ॅल्युमनाय असोसिएशन, नागपूर’तर्फे आयोजित ‘डायमंड ज्युबली गोल्ड मेडल अवॉर्ड’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. मुखर्जी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. मुखर्जी म्हणाले, ‘हाफकिन’मध्ये सुरूवातील अनेक समस्या होत्या, परंतु आता त्या सोडविण्यात आल्या आहेत. औषधांचा तुटवडा जाणार नाही याची दखल घेतली जाणार आहे.नव्या महाविद्यालयांमुळे डॉक्टरांची संख्या वाढणारडॉ. मुखर्जी म्हणाल्या, राज्यात सिंधुदूर्ग, नंदूरबार, सातारा, परभणी, अमरावती, नाशिक व बुलढाणा या सात ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह तीन खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही महाविद्यालये सुरू होतील. यामुळे डॉक्टरांची संख्या वाढून रुग्णसेवेत मदत होईल. ‘सिकलसेल सेंटर’बाबत लवकरच सामंजस्य करारडॉ. मुखर्जी म्हणाले, मेडिकलमध्ये होऊ घातलेले ‘द सेंटर ऑफ एक्सलन्स इन सिकलसेल सेंटर’बाबत शासन सकारात्मक आहे. मेहता फाऊंडेशनने या ‘सेंटर’साठी निधी उभा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच या संदर्भातील सामंजस्य करार (एमओयू) केला जाईल.गरज डॉक्टर-रुग्णांच्या सुसंवादाचीपूर्वी डॉक्टरांवर हल्ले कमी व्हायचे, परंतु अलिकडे वाढले आहेत. यामागील कारणे म्हणजे, डॉक्टर आणि रु ग्ण यांचे नाते दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील बदलते प्रवाह, रुग्णांची वाढलेली समज आणि संख्या अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. यावर उपाय म्हणून डॉक्टर-रुग्णांमध्ये संवाद वाढविण्याची गरज आहे. विशेषत: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांचे कसे समुपदेशन करावे हे शिकविणे आवश्यक झाले आहे. ‘अ‍ॅल्युमनाय असोसिएशन’ने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. मुखर्जी यांनी केले.

टॅग्स :medicinesऔषधंGovernmentसरकार