शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांवरील ग्रॅच्युईटीस पात्र

By admin | Updated: March 2, 2017 02:28 IST

मॉईल कंपनीचे कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर १० लक्ष रुपयांवर ग्रॅच्युईटी मिळण्यास पात्र आहेत

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : मॉईल कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ राकेश घानोडे   नागपूर मॉईल कंपनीचे कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर १० लक्ष रुपयांवर ग्रॅच्युईटी मिळण्यास पात्र आहेत असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी यासंदर्भातील वाद निकाली काढला. मॉईल कंपनीने कर्मचाऱ्यांकरिता १९७५ मध्ये ‘ग्रुप ग्रॅच्युईटी कम लाईफ इन्शुरन्स’ योजना व योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियम लागू केले आहेत. नियमातील कलम ४ मध्ये कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर द्यावयाच्या लाभाविषयी तरतूद आहे. कलम ४ मधील उपकलम ८ अनुसार सेवानिवृत्तीनंतर संबंधित कर्मचाऱ्याला अंतिम वेतनातील १५ दिवसांची रक्कम व एकूण सेवावर्षे यांचा गुणाकार करून निघणारी रक्कम ग्रॅच्युईटी म्हणून मिळायला पाहिजे, पण ही रक्कम २० महिन्यांच्या वेतनापेक्षा जास्त असायला नको. असे असताना केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाने ‘पेमेन्ट आॅफ ग्रॅच्युईटी अ‍ॅक्ट-१९७२’मधील कलम ४(३) अनुसार ग्रॅच्युईटी प्रदान करण्याविषयी परिपत्रक जारी केले. त्यानुसार मॉईलचे महाव्यवस्थापक (कार्मिक) यांनी २६ नोव्हेंबर २०१४ रोजी आदेश जारी करून सेवानिवृत्त उपमहाव्यवस्थापक (खाणी) वसंत बोरकर यांना १० लक्ष रुपयांपेक्षा जास्त ग्रॅच्युईटी देण्यास नकार दिला. याविरुद्ध मॉईल एक्झिक्युटिव्ह असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष अरविंदकुमार शुक्ला व बोरकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका मंजूर करून मॉईलचे कर्मचारी ‘ग्रुप ग्रॅच्युईटी कम लाईफ इन्शुरन्स’ योजनेनुसार लाभ मिळण्यास पात्र असल्याचा निर्णय दिला व २६ नोव्हेंबर २०१४ रोजीचा वादग्रस्त आदेश रद्द केला. असे होते याचिकाकर्त्यांचे म्हणणे मंत्रालयाने परिपत्रक जारी करण्यापूर्वी मॉईल कर्मचाऱ्यांना १० लक्ष रुपयांपेक्षा जास्त ग्रॅच्युईटी मिळत होती. पेमेन्ट आॅफ ग्रॅच्युईटी अ‍ॅक्ट-१९७२’मधील कलम ४(३) मध्ये कमाल १० लक्ष रुपयांपर्यंत ग्रॅच्युईटी देण्याचे बंधन असले तरी, याच कायद्यातील कलम ४ (५) मध्ये ४(३) ही कलम अन्य निवाडे व करारांतर्गत कर्मचाऱ्यांना चांगले लाभ मिळण्यास बाधा ठरणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ‘ग्रुप ग्रॅच्युईटी कम लाईफ इन्शुरन्स’ योजनेनुसार लाभ मिळायला हवेत असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.