शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलाच्या मुद्द्यावरून आजी-माजी ऊर्जामंत्री आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वीज बिलाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापलेले दिसून आले. विशेष म्हणजे उपराजधानीत तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वीज बिलाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापलेले दिसून आले. विशेष म्हणजे उपराजधानीत तर या मुद्द्यावरून आजी-माजी ऊर्जामंत्री आमनेसामने आल्याचे दिसून आले. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात भाजपच्या आंदोलनाचे जिल्ह्यात नेतृत्व केले. तर दुसरीकडे विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने पत्रपरिषद घेऊन भाजपच्या आंदोलनावर टीकास्त्र सोडत आंदोलन फसल्याचा दावा केला. एकूणच या मुद्द्यावरून एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न समोर आला.

‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वाढीव वीजबिलमाफी करणे तसेच वीजबिलात सवलत देण्याची ऊर्जामंत्र्यांची आश्वासने हवेतच राहिली. याविरोधात भाजपने राज्यभरात पाचहून अधिक वेळा आंदोलने केली. मात्र महाविकास आघाडी शासनाने ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी पावले उचलली नाहीत. त्यामुळे भाजपने शुक्रवारी आणखी एक आंदोलन केले. नागपूर जिल्ह्यात बावनकुळे यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व होते. आंदोलनादरम्यान त्यांनी राऊत यांच्यावर ‘हल्लाबोल’ केला. भाजपने जिल्ह्यात व शहरात महावितरणच्या कार्यालयांना कुलूप ठोकून शहरातच वास्तव्याला असलेल्या ऊर्जामंत्र्यांचा निषेध केला. यानंतर काहीच वेळात राऊत यांच्या कार्यालयातून पत्रपरिषदेचे संदेश आले. पत्रपरिषदेदरम्यान राऊत यांनी माजी ऊर्जामंत्र्यांच्या कार्यकाळातच गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. कुणाचेही नाव न घेता अस्तित्व वाचविण्यासाठी असे आंदोलन करण्यात येत असल्याचेदेखील ते म्हणाले. २०१४ ते २०१९ या कालावधीत महावितरणची १४ हजार १५४ कोटींवरील थकबाकी ४१ हजार १३३ कोटींवर कशी गेली, असा प्रश्न उपस्थित केला. इंधन दरवाढीवरुन त्यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेवरदेखील प्रश्न उपस्थित केले. वीजबिलाच्या मुद्द्यावरील आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून इंधनदरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.