शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खरबडेंच्या नियुक्तीवरून शासनाला फटकारले

By admin | Updated: April 20, 2017 20:47 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी डॉ. सुरेंद्र खरबडे यांचीच दुस-यांदा नियुक्ती करण्यात आल्यामुळे

ऑनलाइन लोकमत

नागपूर,दि. 20 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी डॉ. सुरेंद्र खरबडे यांचीच दुस-यांदा नियुक्ती करण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य शासनास कडक शब्दांत फटकारले.
अनेक सेवानिवृत्त न्यायाधीश उपलब्ध असताना खरबडडे यांचीच चौकशी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच, चौकशी अधिकारीपदी योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यावर २४ एप्रिलपर्यंत निर्णय घेण्यास सांगितले. शासन यात अपयशी ठरल्यास योग्य तो आदेश देण्यात येईल अशी तंबीही न्यायालयाने शासनास दिली.
 
खरबडे हे वृद्धत्व व आजारपणाचे कारण सांगून स्वत:च चौकशीच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. त्यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयाकडून आदेश प्राप्त केला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बँकेचे माजी अध्यक्ष व घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार सुनील केदार यांची याप्रकरणाशी संबंधित विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली. परिणामी या याचिकेतील अंतरिम आदेशामुळे थांबलेली घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. चौकशी अधिकारीपदी पात्र व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी मुळ याचिकाकर्ते ओमप्रकाश कामडी यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयाने शासनाला यावर उत्तर मागितले होते. त्यानंतर शासनाने पुन्हा खरबडे यांचीच चौकशी अधिकारीपदी नियुक्ती केली. न्यायालयाला ही बाब खटकली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कामडी यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.