शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर व चंद्रपुरात श्रीरामांची प्रतिमा असलेले ‘सुवर्ण नाणे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 10:42 IST

चंद्रपुरातील इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी आपल्याकडे बाराव्या शतकातील सुवर्णमुद्रा असल्याचा दावा केला आहे. तर नागपुरातही दीपक संत यांच्या संग्रहात प्रभू श्रीरामाचे चित्र असलेली दुर्मिळ तांब्याची नाणी आहेत.

ठळक मुद्देविग्रहराज-४ राजाच्या कार्यकाळातील निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपुरातील इतिहास संशोधक तथा भारतीय सांस्कृतिक निधीचे संयोजक अशोकसिंह ठाकूर यांनी आपल्याकडे १२ व्या शतकातील सुवर्ण नाणे असल्याचा दावा केला आहे. अयोद्धेला श्रीरामांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त साधून ठाकूर यांनी बाराव्या शतकातील सुवर्णमुद्रा असल्याचा दावा केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. तर नागपुरातही दीपक संत यांच्या संग्रहात प्रभू श्रीरामाचे चित्र असलेली दुर्मिळ तांब्याची नाणी आहेत.ठाकूर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये राज्य करणाऱ्या साकंबरी (शांबर) चहमान या राजवंशाच्या विग्रहराज-४ या राजाच्या कार्यकाळात हे सुवर्ण नाणे छापण्यात आले होते. या राजाचा कार्यकाळ इ.स. ११५३ ते ११६३ असा असून या काळातच हे नाणे छापण्यात आल्याचे संशोधन आहे. या नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा अंकित असून त्यांच्या एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात बाण अंकित आहे. त्यावर ‘श्रीराम’ असे लिहिलेले असून नाण्यावरील प्रतिमेला फुलांची सजावट आहे. कमळाची फुले, सोबत हंस पक्षी यावर अंकित आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला देवनागरी भाषेत तीन ओळीत ‘श्रीमदविग्र/हराजदे/व’ असे लिहिलेले आहे. या नाण्याचे वजन ४.०२ ग्रॅम आहे.ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचीन काळी मंदिरात शिल्पकलेचा वापर केला जायचा, तसाच वापर या नाण्याच्या सजावटीसाठी केला आहे. देशात केवळ दोघांकडेच हे नाणे असून उत्तम अवस्थेतील व दुर्मिळ आहे. ऑर्कालॉजिकल विभागाच्या नियमानुसार दुर्मिळ ताम्रपत्र, अतिप्राचीन मूर्ती जवळ बाळगण्यास मनाई आहे; मात्र नाणे बाळगण्यासाठी अधिकृत नाणे संग्राहकांना परवानगी आहे. आपल्याकडे २७ हजार दुर्मिळ नाणी असून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी छापण्यात आलेल्या दोन सुवर्णमुद्रा (होन) असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.नागपुरात प्रभू श्रीराम यांचे दुर्मिळ नाणेनागपुरातील दीपक संत यांच्या संग्रहात प्रभू श्रीरामाचे चित्र असलेली दुर्मिळ तांब्याची नाणी आहेत. यावर एका बाजूने प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाचे चित्र काढलेले आहे. तर दुसऱ्या भागात प्रभू श्रीराम आणि सीतेचे चित्र काढलेले आहे. दीपक संत यांना ५० वर्षापूर्वी हे नाणे मिळाले होते. त्यांनी सांगितल्यानुसार हे नाणे राजे महाराजांच्या काळातील आहे. हे नाणे चलनात नव्हते, श्रद्धेपोटी ही नाणी राजे महाराजे स्वत:जवळ बाळगत होते. दीपक संत हे जुन्या नाण्यांचे संग्राहक आहेत. त्यांच्या संकलनात असलेले हे दुर्मिळ नाणे आहे. नाणे संग्राहकांना परवानगी आहे. आपल्याकडे २७ हजार दुर्मिळ नाणी असून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी छापण्यात आलेल्या दोन सुवर्णमुद्रा (होन) असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर