शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
3
रुपया ९६ पार, इतिहासात पहिल्यांदा डॉलरच्या तुलनेत इतकी कमकुवत झाली भारतीय करन्सी; सामान्यांवर काय परिणाम होणार?
4
अमित शाह यांना धमकी देणं भोवलं, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर बंगालमध्ये गुन्हा दाखल; कारवाई होणार
5
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
6
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
7
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
8
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
9
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
10
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
11
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
12
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
13
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
14
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
15
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
16
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
17
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
18
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
19
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
20
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
Daily Top 2Weekly Top 5

वीज द्या, अन्यथा इंडस्ट्री हलवू

By admin | Updated: May 20, 2014 01:02 IST

मिहान-सेझमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित वीज पुरवठ्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे अनेक उद्योजक त्रस्त आहेत. वीज द्या, अन्यथा इंडस्ट्री हलवू,

मिहान-सेझमधील उद्योजकांचा इशारा : आयोगाकडे पुन्हा याचिका

नागपूर : मिहान-सेझमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित वीज पुरवठ्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे अनेक उद्योजक त्रस्त आहेत. वीज द्या, अन्यथा इंडस्ट्री हलवू, असा इशारा मिहान-सेझमधील उद्योजकांनी शासनाला दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस सरकारला अपयश आल्याने मुख्यमंत्री विदर्भातील उद्योजकांच्या गंभीर मुद्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. गेल्या सहा महिन्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाला जवळपास ३५० पत्रे लिहिली आहेत. एकाचेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सरकार या प्रश्नावर किती गंभीर आहे, हे यावरून दिसून येते. एमएडीसीने आमंत्रित केले म्हणून आम्ही मिहान-सेझमध्ये बँकांकडून कर्ज घेऊन उद्योग लावले. विजेसारख्या पायाभूत सुविधांकडे एमएडीसी कानाडोळा करू शकत नाही. उद्योगाकडे कानाडोळा करून आता विजेसाठी आम्हालाही आंदोलन करावे लागेल का? असा सवाल मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर भोजवानी यांनी लोकमतशी बोलताना केला. मिहानचे कार्यालय शोभेची वास्तू नागपूर आणि मुंबई येथील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची कायांलये केवळ शोभेची वास्तू झाली आहे. या दोन्ही कार्यालयातील अधिकार्‍यांना निर्णय घेण्याचा काहीही अधिकार नाही. अधिकारी आणि कर्मचारी केवळ पगारापुरतेच आहेत. मिहान-सेझमध्ये काय घडत आहे, याची पुसटीशी कल्पना अधिकार्‍यांना नाही. नागपूरला विचारले तर म्हणतात मुंबई कार्यालयाला विचारा. एमएडीसीचे उपाध्यक्ष सत्रे यांना विचारले असता ते म्हणतात, ही बाब माझ्या अधिकारात येत नाही. मग दाद कुणाकडे मागावी, हा गंभीर प्रश्न आहे. आयोगाकडे याचिका दाखल एका याचिकेवर वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन एमएडीसी आणि महावितरण करीत नाही. वीज मिळावी म्हणून आम्ही आयोगाकडे पुन्हा याचिका दाखल केली आहे. भोजवानी यांनी सांगितले की, आयोग असो वा महावितरण हे राजकीय नेत्याच्या अधिपत्याखाली येते. सत्तेतील नेत्याला वाटले तर एका रात्रीतून हा प्रश्न सुटतो. पण कुणाला काहीही घेणेदेणे नाही. अशा प्रश्नासाठी गुजरातेतील मोदी सरकारच हवे. विदर्भातील वीज पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात निर्मित विजेचा पुरवठा विदर्भाबाहेर फारच कमी दरात केला जातो. वितरण करताना होणारा तोटा पकडून प्रति युनिट दर ३.२० रुपये आहे. राजकर्ते वैदर्भीयांना डावलून विदर्भाबाहेर वीज कमी दरात देऊ शकतात, तर मग विदर्भातील उद्योजकांना का नाही, असा सवाल भोजवानी यांनी केला. (प्रतिनिधी)