शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज नेत्यांनी तळ ठोकला

By admin | Updated: January 5, 2017 02:18 IST

नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रथमच या क्षेत्राचे खासदार, आमदार, माजी केंद्रीय मंत्री, माजी मंत्री तसेच स्थानिक नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून

काटोलमध्ये चुरस वाढली : निवडणुकीतील प्रचाराने तापलेय वातावरण विजय कडू  काटोल नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रथमच या क्षेत्राचे खासदार, आमदार, माजी केंद्रीय मंत्री, माजी मंत्री तसेच स्थानिक नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून उमेदवार भक्कमपणे निवडणूक रिंगणात उतरविले आहेत; सोबतच हे दिग्गज नेते काटोलमध्ये तळ ठोकून आहेत. एवढेच काय तर विद्यमान केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या प्रचारसभांचा सपाटा सुरू झालेला आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली आहे. काटोलमध्ये नगराध्यक्षपदासाठी ९ तर २३ नगरसेवकपदासाठी ११४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपकडून आमदार डॉ. आशिष देशमुख, विदर्भ माझाकडून माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर, शेकापकडून माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांच्यात चुरस महत्त्वाची असली तरी, राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळून उमेदवारांच्या प्रचारात रंगत आणली आहे. २०११ ते २०१६ दरम्यान राहुल देशमुख यांची सत्ता असली तरी, त्यापूर्वी सलग १० वर्षे व आता गेल्या सहा महिन्यांपासून चरणसिंग ठाकूर यांची भाजपच्या मदतीने नगर परिषदेत सत्ता आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगर परिषद पोटनिवडणुकीत नऊपैकी सात जागा भाजपने जिंकल्या. दरम्यान, भाजपचे आ. डॉ. आशिष देशमुख व चरणसिंग ठाकूर यांच्यात बेबनाव झाल्याने ठाकूर यांनी विदर्भ माझा पक्षाच्या तिकिटवर आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले. विदर्भ माझाकडून नगराध्यक्षपदासाठी वैशाली ठाकूर, भाजपकडून डॉ. प्रेरणा बारोकर, शेकापकडून अर्चना देशमुख, राष्ट्रवादीकडून रेणुका डेहनकर, काँग्रेसने नव्या दमाच्या उमेदवार म्हणून आशा चरडे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. प्रचार जोरात प्रभागांतर्गत विविध पक्षांच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारासाठी प्रचार सुरू केला असून कॉर्नर सभांचा सपाटा लावला आहे. शहराच्या दोन-तीन चौकात व प्रचार सभेच्या ठिकाणी स्क्रीन लावून उमेदवारांच्या भाषणांच्या आॅडिओ-व्हिडिओ क्लिप लावल्या जात आहेत. शहरात नव्यानेच सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक चॅनलने तर धम्माल उडविली आहे. प्रत्येक उमेदवार, त्यांच्या पक्षाचे नेते यांना बोलते करून प्रचारात रंगत भरली आहे. पक्षीय बलाबल असे मागील सार्वत्रिक निवडणुकीत पाच प्रभागातून शेतकरी कामगार पक्षाचे १३ आणि चरणसिंग ठाकूर व अनिल देशमुख यांच्या कुंतलापूर विकास आघाडीचे ८ असे एकूण २१ नगरसेवक निवडून आले होते. परंतु सहा महिन्यांपूर्वी शेकापच्या तत्कालीन नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपचे सात तर शेकापचे दोन नगरसेवक निवडून आले. त्यामुळे सध्यास्थितीत शेकापचे तीन नगरसेवक आहेत. ४४ केंद्रावर मतदान काटोल नगर परिषद निवडणुकीत १६३८४ पुरुष, १५४४० महिला आणि ३ तृतीयपंथी असे एकूण ३१८२७ मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण ४४ केंद्र असून ८ जानेवारीला मतदान होत आहे. याकरिता ४८ मतदान केंद्राधिकारी, १४७ कर्मचारी असे एकूण १९५ अधिकारी - कर्मचारी कर्तव्य बजावणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना पठारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सांगितले. याशिवाय नगर परिषदेचे अविनाश बरसे, मनोज जवंजाळ, नामदेव बारई हेसुद्धा कार्यरत आहेत.