शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज व्हा

By admin | Updated: July 27, 2015 04:11 IST

देशात लोकशाही असली तरी त्यावर भांडवलदारांचे नियंत्रण आहे. आरक्षणाच्या नावाखाली जातीजातीत भांडणे लावून

सुधीर सावंत : आरक्षण संघर्ष परिषदेत आवाहननागपूर : देशात लोकशाही असली तरी त्यावर भांडवलदारांचे नियंत्रण आहे. आरक्षणाच्या नावाखाली जातीजातीत भांडणे लावून उद्योगपती मजा मारीत आहेत. जातीनिहाय आरक्षणाचा कायदा व्हावा, यासाठी बहुजन समाजाने लढ्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन आरक्षण संघर्ष परिषदेत ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी रविवारी केले. २६ जुलै हा आरक्षणदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने समता सैनिक दल, समता एम्प्लॉईज फेडरेशन, संविधान मोर्चा, ओबीसी सेवा संघ, फुले-आंबेडकरी राष्ट्रीय युवक संघटना व आरक्षणसमर्थक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी समता एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश अनिल वैद्य तर सत्कारमूर्ती विजय मेश्राम व प्रदीप ढोबळे आदी उपस्थित होते.समता हा संविधानाचा मूळ आत्मा आहे, या हेतूनेच अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात आले आहे. परंतु फुले, शाहू व आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या आरक्षणाला धक्का लावण्याचे कटकारस्थान सुरू आहे. ते हाणून पाडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायव्यवस्था संविधानाची संरक्षक आहे. मग या व्यवस्थेत आरक्षण का नाही. आरक्षणाच्या नावाखाली ओबीसी विरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अशी भांडणे लावण्याचा प्रकार सुरू आहे. वास्तविक या घटकांना नोकऱ्या व शिक्षण संस्थात आरक्षण आहे. परंतु ओबीसीला शिष्यवृत्ती देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. यामुळेच अजित पवारांचे सरकार गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही तेच करीत आहे. त्यांनी ओबीसींच्या सवलतींना विरोध केला तर त्यांचेही सरकार असेच जाईल. कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटींची तरतूद होते. परंतु ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सरकारकडे २५० कोटी नसल्याची टीका ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी केली. यावेळी नरेंद्र जारोंडे यांनी पदोन्नतीतील आरक्षण, विजय शिंदे यांनी मराठा आरक्षण, अजित पाशा यांनी मुस्लीम आरक्षण, मुकुंद अडेवार यांनी भटके विमुक्तांचे आरक्षण, अनिल वैद्य, गिरधर गजबे, अ‍ॅड. गुणरत्न रामटेके, हरीश नागदिवे, सरिता गायकवाड, प्रतिभा केचे, गणेश भोईर व अस्मिता अभ्यंकर आदींनी विविध विषयांवरील आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. परिषदेत विविध ठराव पारित करण्यात आले. (प्रतिनिधी)