शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांना निधीचे बळ

By admin | Updated: March 11, 2016 03:02 IST

नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू नये यासाठी शासनाने निधीचे बळ दिले आहे.

नव्या नगर परिषद व नगर पंचायतीला आर्थिक साहाय्य : रस्त्यांसाठी ३०.३० कोटींचे अनुदान नागपूर : नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू नये यासाठी शासनाने निधीचे बळ दिले आहे. नागपूर जिल्ह्यातील एकूण १३ नगर परिषद व ५ नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायतीला याचा लाभ मिळणार आहे. खास रस्त्यासाठीच एकूण ३० कोटी ३० लाख रुपयाचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागपूर आणि विदर्भाच्या विकासाबाबत दक्ष असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निधी प्राप्त झाला आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक बळ मिळाले असून यातून नागरी सुविधा निर्माण करण्यास मोठी मदत होणार आहे. राज्यातील महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायत व नगर परिषद यांच्या विकासाकरिता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यात विशेष रस्ता अनुदान, नव्याने स्थापन केलेल्या नगर पंचायती, नगर परिषद व नगरपालिका यांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी साहाय्य यासारख्या बाबींचा समावेश आहे. राज्यातील महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत यांना रस्ता व तदनुषंगिक बाबींच्या विकास कामासाठी सर्वसाधारण रस्ता अनुदान व विशेष रस्ता अनुदान अशा दोन प्रकारे ३२५ कोटी २८ लाखांची मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १३ नगर परिषद व ५ नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायतला एकूण ३० कोटी ३० लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. नगर विकास विभागांतर्गत नव्याने निर्माण झालेल्या नगर परिषदांना आर्थिक साहाय्य योजनेत नागपूर जिल्ह्यातील कन्हान-पिंपरी व वाडी या नव्याने निर्माण झालेल्या नगर परिषदेला एकूण १४ कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यावर्षी ९ कोटी ८० लाख रुपये वितरित केलेले आहे. तसेच नगर विकास विभागांतर्गत नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायतला आर्थिक साहाय्य या योजनेतून महादुला, मौदा व हिंगणा या नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायतला एकूण १३ कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.