निकालात आघाडी

By Admin | Updated: May 27, 2014 01:46 IST2014-05-27T01:46:01+5:302014-05-27T01:46:01+5:30

सीबीएसईच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांनीदेखील घवघवीत यश मिळवले आहे. नागपूर विभागातील बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मागील

Front of the lead | निकालात आघाडी

निकालात आघाडी

सीबीएसई बारावी : अनेक शाळांचा निकाल ‘सेंट-परसेंट’

नागपूर : सीबीएसईच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांनीदेखील घवघवीत यश मिळवले आहे. नागपूर विभागातील बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मागील वर्षापेक्षा यंदा सीबीएसईच्या निकालात शाळांमध्ये देखील चांगलीच चुरस पहायला मिळाली. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार अनेक शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे तर काही मोजक्या शाळांचा निकाल ७० ते ९५ टक्क्यांदरम्यान लागला. भवन्स बी.पी विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स), सेंटर पॉर्इंट शाळा (काटोल रोड) आणि मॉडर्न स्कूल (कोराडी रोड) यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या तिन्ही शाळांनी आपली परंपरा कायम राखत शंभर टक्के निकाल दिला. मात्र यंदा बाजी मारली ती श्रीकृष्णनगर येथील भवन्स बी.पी. विद्यामंदिरने. वाणिज्य व ‘ह्युमॅनिटीज्’या अभ्यासक्रमांत येथीलच विद्यार्थी ‘टॉप’ ठरले आहेत. (प्रतिनिधी) शाळेच्या सांघिक प्रयत्नांचे फळ दरवर्षीप्रमाणे यंदादेखील शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेत नियमितपणे वर्ग होत होते व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. शिक्षक अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांचे समुपदेशनदेखील करत होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आला व याचेच फळ निकालांच्या स्वरूपात समोर आले असे मत श्रीकृष्णनगर येथील भवन्स बी.पी. विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका ए.शास्त्री यांनी व्यक्त केले.

Web Title: Front of the lead