मित्रांनी गायिली कराओकेवर गाणी

By Admin | Updated: January 1, 2016 04:47 IST2016-01-01T04:47:31+5:302016-01-01T04:47:31+5:30

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे काही मित्र यानिमित्ताने एकत्र आले. नवीन वर्षाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्याचे त्यांनी ठरविले

Friends sing Kareoke songs | मित्रांनी गायिली कराओकेवर गाणी

मित्रांनी गायिली कराओकेवर गाणी

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे काही मित्र यानिमित्ताने एकत्र आले. नवीन वर्षाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्याचे त्यांनी ठरविले आणि संगीताच्या माध्यमातून नव्या वर्षाचे स्वागत त्यांनी केले. यासाठी सोमलवाडा परिसरात एका मित्राच्या गच्चीवर सारे मित्र एकत्रित आले आणि त्यासाठी कराओके सिस्टीमही आणली. याप्रसंगी मित्रांनी गझल आणि गीतांनी समां बांधत नव्या वर्षाचे स्वागत केले. यासाठी इंटेरिअर डिझायनर आणि संगीतप्रेमी असलेले पराग नामपल्लीवार यांनी पुढाकार घेतला. त्यांना संजय चोपडे, राजेश उष्केवार, प्रफुल्ल खापरीकर, सतीश कुंडनवार, यशवंत केऱ्हलकर यांनी सहकार्य केले आणि जुन्या मित्रांची मैफिल मस्त रंगली. अर्थात या आनंदात नव्या वर्षाचे स्वागत करताना संयमित ड्रिंक्सची व्यवस्था होती. संगीत सादरीकरण करून नव्या वर्षाचे स्वागत करताना मजा आली, असे या सर्वच मित्रांनी सांगितले.

Web Title: Friends sing Kareoke songs