शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 07:18 IST

Nagpur News: वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा आणि धामणगाव शिवारात बुधवारी (दि. २७) दुपारी घडली.

सावनेर/सिंगोरी - वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा आणि धामणगाव शिवारात बुधवारी (दि. २७) दुपारी घडली. धापेवाडा (ता. कळमेश्वर)शिवारातील शेतात पहाटीला खत देणाऱ्या आईसह तरुण मुलगा आणि मजूर महिलेचा तर धामणगाव (ता. मौदा) शिवारात पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली आश्रय घेतलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

वंदना प्रकाश पाटील (३९), ओम प्रकाश पाटील (२२), निर्मला रामचंद्र पराते (६५), तिघेही रा. वॉर्ड क्रमांक-३, धापेवाडा, ता. कळमेश्वर आणि सागर पंढरी जुमडे (२७, रा. धामणगाव, ता. मौदा) अशी मृतांची नावे आहेत. प्रकाश शंकर पाटील यांचे धापेवाडा शिवारात शेत आहे. वंदना, ओम आणि निर्मला यांच्यासह अन्य चार महिला शेतातील पहाटीला खत देत होते. तिघे शेताच्या मध्यभागी होते तर चार महिला शेताच्या धुन्ऱ्याजवळ होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली. 

गणपतीच्या स्थापनेपूर्वीच..वंदना पाटील या दरवर्षी गणपती बसवितात. ओम गणपतीची मूर्ती आणण्यासाठी कळमेश्वरात गेला होता. तो दुपारी २ वाजेच्या सुमारास मूर्ती घेऊन घरी आला आणि लगेच आईला मदत करण्यासाठी शेतात गेला. तो आईसोबत झाडांना खत देत असताना काळाने झडप घातली.

झाडाचा आश्रय जिवावर बेतला सागर जुमडे हा बुधवारी सायंकाळी कढोली येथून धामणगावला येत होता. गावाजवळ पोहोचताच पावसाला सुरुवात झाली आणि त्याने रोडलगतच्या झाडाखाली आश्रय घेतला. त्यातच जोरात कडाडलेली वीज झाडावर कोसळली आणि सागर होरपल्याने गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. या घटनेमुळे धामणगावात शोककळा पसरली होती. 

टॅग्स :nagpurनागपूर