शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

लाहोरी गोळीबार प्रकरणात पाच गजाआड

By admin | Updated: November 16, 2016 02:58 IST

पोलिसांच्या डोळ्यादेखत धरमपेठेतील लाहोरी बारसमोर गोळीबार करणाऱ्या कुख्यात शेखू आणि माया गँगच्या

कुख्यात फरार : पोलिसांची शोधाशोध सुरूनागपूर : पोलिसांच्या डोळ्यादेखत धरमपेठेतील लाहोरी बारसमोर गोळीबार करणाऱ्या कुख्यात शेखू आणि माया गँगच्या पाच गुंडांना मंगळवारी सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पोलीस त्यासाठी शोधाशोध करीत आहेत. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास लाहोरीच्या आतमध्ये बसलेल्या एका तरुणीची छेड काढण्यावरून सुरू झालेल्या हाणामारीनंतर कुख्यात शेखू, पप्पू डागोर, मिहीर मिश्रा, आनंद, राहुल, भुऱ्या आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी लाहोरीवर हल्ला चढवला. बार संचालक समीर शर्माच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर शर्माच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी शेखू खान, पप्पु डागोर, रविश, पवन चौधरी, आनंद तसेच त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. यातील पवन चौधरी (वय २२) याला तहसील पोलीस ठाण्यात सोमवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने मिलिंद बोरकर (वय ३१)आणि हर्षल राऊत (वय २६) या दोघांना पकडले. रात्री पुन्हा टिंग्या ऊर्फ आकाश चव्हाण (वय २४)आणि स्वप्नील भोयर (वय २४) या दोघांना अटक करण्यात आली. कुख्यात शेखू आणि पप्पू तसेच मिहीर अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. सोमवारी रात्री तहसील परिसरात पवनसोबत आणखी दोन ते तीन जण होते, ते कोण होते, त्याबाबत उलटसुलट चर्चा आहे. दरम्यान, सदर परिसरात बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या एका कारचीही पोलिसांनी तपासणी केली. ती कार आरोपींची असल्याची चर्चा होती. पोलिसांनी मात्र त्याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)‘गेम’ ची तयारीदीड महिन्यापूर्वी लाहोरीपासून हाकेच्या अंतरावर कुख्यात सचिन सोमकुंवरची हत्या झाली. तेव्हापासून गुंडांच्या एका टोळीने या खुनामागे असल्याच्या संशयावरून एकाच्या ‘गेम’ ची तयारी केली असल्याची जोरदार चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे. रविवारी रात्री थोडक्यात गेम हुकल्याचेही बोलले जाते. पोलिसांच्या कानावर ही चर्चा गेल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण फारच गांभीर्याने घेतले असून, मंगळवारी पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या साप्ताहिक गुन्हे आढावा बैठकीतही (क्राईम मिटींग) या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली.