शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आधी केली रेकी नंतर लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:24 IST

उमरेड : बुधवारी पेठ येथील ‘अरुणोदय-२’, विमल कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी झालेली लुटमार आधी रेकी आणि मग जबरी चोरी असण्याची दाट ...

उमरेड : बुधवारी पेठ येथील ‘अरुणोदय-२’, विमल कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी झालेली लुटमार आधी रेकी आणि मग जबरी चोरी असण्याची दाट संभावना पोलीस तपासात व्यक्त होत आहे. कॉम्प्लेक्ससमोरील घरी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत दोन्ही लुटारू कैद झाले आहेत. विमल अरुण गिरडकर या घरी एकट्या असताना रात्री ७.३० वाजताच्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवित दोन लुटारुंनी दीड तोळ्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्यांचा सोन्याचा गोफ आणि नगदी तीन हजार रुपये असा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून उमरेड पोलिसांची चमू विविध स्तरावर तपास करीत आहेत.

सदर घटनेचा उमरेड पोलीस ठाण्यात ३९२, ४५२, ३४ भादवी, सहकलम ३/२५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत श्वानपथकाच्या माध्यमातूनही तपासाचे चक्र फिरविण्यात आले. फिंगर प्रिंट विशेषज्ञांना पाचारण करण्यात आले होते. लुटारूंनी बंदूक पिशवीत आणली होती. ‘काका आहेत का’ असा प्रश्न विमल गिरडकर यांना करीत लुटारूंनी घरात प्रवेश केला. गिरडकर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घराबाहेर पडतात आणि ८ ते ९ वाजता घरी परततात, असा दिनक्रमही लुटारूंना माहिती असावा, अशीही बाब बोलली जात आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

कॉम्प्लेक्समध्ये सीसीटीव्ही नाहीत

साधारणत: पाच वर्षापूर्वी बांधकाम पूर्णत्वास आलेल्या आणि निवासव्यवस्थेसाठी सज्ज झालेल्या या कॉम्प्लेक्समध्ये एकूण ८ सदनिका आणि दोन डुप्लेक्स आहेत. कॉम्प्लेक्स उभारले खरे परंतु याठिकाणी एकही सीसीटीव्ही अद्याप लावण्यात आले नाही, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत अरुण गिरडकर यांच्याशी चर्चा केली असता लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या तयारीत होतो. तब्येतीमुळे शक्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

घटनाक्रम १० मिनिटांचा

कॉम्प्लेक्समध्ये सीसीटीव्ही नसले तरी या कॉम्प्लेक्ससमोर निवासी असलेले निशांत ताजणे यांच्याकडील सीसीटीव्हीत दोन लुटारू येताना-जाताना दृष्टिक्षेपात येत आहेत. गुरुवारी रात्री ७ वाजून २४ मिनिटांनी दोघे कॉम्पलेक्समध्ये प्रवेश करीत असून केवळ दहा मिनिटातच रात्री ७ वाजून ३३ मिनिटांनी पहिला लुटारू तर लगेच दोन मिनिटात दुसरा लुटारू बाहेर पडत असतानाचे चित्रण या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. दोघांनीही रुमालाने तोंड बांधले होते. रात्रीची वेळ असल्याने आणि रुमालाने तोंड बांधून असल्याने चेहरे मात्र अस्पष्ट दिसून येत आहेत. अतिशय सावकाशपणे कॉम्पलेक्समधून बाहेर पडत असल्याचीही बाब लक्षात येत आहे. दोघेही कॉम्पलेक्सलगतच्या जुन्या पोस्ट ऑफीसच्या दिशेने पायीच गेल्याचेही दिसून येत आहे. ते नेमके कशाने आले होते याचा शोध घेतला जात आहे.