शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गोवा कॉलनीतील फायरिंग दारूच्या गुत्त्यावरील वादातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गुरुवारी रात्री गोवा कॉलनीत झालेली फायरिंगची घटना दारूच्या गुत्त्यावर झालेल्या वादामुळे घडल्याचे स्पष्ट झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - गुरुवारी रात्री गोवा कॉलनीत झालेली फायरिंगची घटना दारूच्या गुत्त्यावर झालेल्या वादामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सदर पोलिसांनी रात्रभर धावपळ करून सहाही आरोपींच्या मुसक्या बांधल्या.

अशफाक अनवर खान (वय २०), मुस्तकिन सलीम खान (वय २५), आबिद अहमद खान (वय १९), आस्टिन विल्सन जोसेफ (वय १९), महताब असिमुद्दीन अंसारी (वय १९) आणि अरमान अहमद खान (वय २२) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ते सर्व बीएसएनएलच्या कार्यालयाजवळ असलेल्या मरियमनगर झोपडपट्टीत राहतात.

सदर मधील गोवा कॉलनीत सलीम आणि शकिल पठाण हे गावठी दारूची अवैध विक्री करतात. आरोपी अशपाक याला दारू, गांजाचे व्यसन आहे. तो गुरुवारी रात्री ७ वाजता आपल्या एका मित्रासह सलिमच्या दारू गुत्त्यावर आला. तेथे दारूचे माप कमी देण्यावरून त्याचा सलीम आणि शकिलसोबत वाद झाला. यावेळी सलिम आणि शकिलने आरडाओरड करणाऱ्या अशपाक आणि त्याच्या मित्राला बाहेर काढण्याचे सूरज रामदास नायडू (वय २१) याला सांगितले. सूरजने अशपाक आणि त्याच्या मित्राला हुसकावून लावले असता आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे सूरजने त्यांना झापड लगावल्या. या अपमानामुळे आरोपींनी त्याला तेथेच थांब, हमला घेऊन येतो, असे म्हटले आणि पळून गेले. रात्री ९ च्या सुमारास दोन दुचाकींवर आरोपी अशपाक, मुस्तकिन, आबिद, आस्टिन, महताब आणि अरमान असे सहा जण आले. अशपाककडे पिस्तुल, तर अन्य आरोपींकडे तलवार, चाकू, भाला अशी घातक शस्त्रे होती. त्यांनी सलिम आणि सूरजच्या नावाने शिमगा करून ते नजरेस पडताच त्यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. नशिब बलवत्तर म्हणून कुणालाही गोळी लागली नाही. मात्र, या घटनेमुळे गोवा कॉलनीत प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पोलीस उपायुक्त विनिता साहू , सहायक आयुक्त सुधीर नंदनवार, ठाणेदार संतोष बकाल आणि मोठा ताफा घटनास्थळी पोहचला. आरोपींची माहिती घेऊन पहाटेपर्यंत आरोपींची शोधमोहिम राबविण्यात आली. त्यानंतर सहाही आरोपी हाती लागले.

---

मुंबईहून आणले पिस्तुल

आरोपी अशपाक हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध चोरीच्या सोन्याची विल्हेवाट लावण्याचा चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्याला दारू, गांजाचे व्यसन असून तो अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतल्याचा संशय आहे. त्याने मुंबईतून ही पिस्तुल आणल्याचे पोलिसांना सांगितले आहे. कुणाकडून आणली, ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

----