शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: July 28, 2015 03:48 IST

याकूब मेमनच्या डेथ वॉरंटसंदर्भातील याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे नागपूरच्या मध्यवर्ती

नागपूर : याकूब मेमनच्या डेथ वॉरंटसंदर्भातील याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी आता अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी सकाळी कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहातील तयारीची पाहणी करून संबंधितांची प्रदीर्घ बैठक घेतली. नेहमीप्रमाणे सोमवारी सुद्धा त्यांनी पत्रकारांना टाळले. फाशी टाळण्यासाठी याकूबने राज्यपालांकडे दयेचा अर्ज सादर करून सर्वोच्च न्यायालयात डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे. दयेचा अर्ज आणि याचिका या दोन्हीवर आज सोमवारी सुनावणी होणार, असे अपेक्षित होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी करण्याचे निश्चित केले. तर दयेच्या अर्जाबाबतची स्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे साऱ्यांच्या नजरा आता मंगळवारकडे लागल्या आहेत. दरम्यान, गुरुदासपूरला झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या सतर्कतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीच्या उपाययोजना अधिकच कडक केल्या. कारागृहात जाणारे नागरिक, वकील आणि पत्रकारच नव्हे तर पोलिसांचीही आज रीतसर तपासणी केली जात होती. खाजगी वाहनात बसून असलेल्या गणवेशधारी पोलिसांनाही त्यांचे ओळखपत्र मागतिले जात होते. त्याची खात्री पटल्यानंतरच कारागृह परिसरात प्रवेश दिला जात होता. (प्रतिनिधी)हेलिकॉप्टरने टेहळणी दुसरीकडे आज दुपारी एक हेलिकॉप्टर आणि छोटे विमान आलटून-पालटून वारंवार कारागृहाच्या वरच्या भागात टेहळणी करून कारागृहाच्या आतमधील तसेच बाहेरच्या भागातील स्थितीची पाहणी करीत होते. तिकडे आतमध्ये कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सोमवारी पुन्हा आतमधील फाशी यार्डसह अनेक बराकींची स्वत: पाहणी केली. ‘तेथील’ तयारी अंतिम टप्प्यात असल्याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतली. कोणत्याच प्रकारचा धोका पत्करायचा नाही, असे बैठकीत असलेल्यांना सांगण्यात आले. सुरक्षेसंदर्भात कुणी लहानशी चूक करीत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी आतमधील सर्व अधिकाऱ्यांना बजावून सांगितल्याचे समजते.