शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आमदारासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: January 5, 2016 03:18 IST

स्थानिक गडमंदिर परिसरातील राजकमल रिसॉर्टमध्ये धुडगूस घालत साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी रामटेक

रामटेक : स्थानिक गडमंदिर परिसरातील राजकमल रिसॉर्टमध्ये धुडगूस घालत साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आ. डी.एम. रेड्डी यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या रिसॉर्टमधील दारू व मांसाहार विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी रविवारी रिसॉर्टसमोर निदर्शने केली होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी नागपूर ते रामटेक मोटारसायकल रॅली काढली होती. या रॅलीचे रामटेक शहरात ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले. पुढे ही रॅली गडमंदिराच्या दिशेने निघाली. गडावर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. दरम्यान, आ. रेड्डी कार्यकर्त्यांसह गडमंदिर परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या राजकमल रिसॉर्टजवळ पोहोचले. त्याचवेळी त्यांनी ‘बार बंद करा, मांसाहार बंद करा’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, रेड्डींनी कार्यकर्त्यांचे उद्बोधन केले. ‘हा धार्मिक परिसर आहे. येथे मांसाहार वर्ज्य असायला पाहिजे. दारू विक्रीसुद्धा बंद असायला पाहिजे’ अशी आग्रही भूमिका घेतली. आपण शासनाकडे या संबंधात पत्रव्यवहार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी रिसॉर्टमध्ये प्रवेश करीत खुर्च्या व कुंड्यांची फेकाफेक करायला सुरुवात केली. काहींनी मद्याच्या बाटल्या फोडल्या तर काहींनी स्वयंपाकगृहातील मांसाहाराची फेकाफेक केली.