शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिक अरोरा परिवाराविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: May 21, 2016 03:04 IST

पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा अनन्वित छळ केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी सिव्हील लाईन मधील हॉटेल व्यावसायिक हरदिपसिंग अरोरा तसेच ...

विवाहितेचा अनन्वित छळ : अनैसर्गिक अत्याचारनागपूर : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा अनन्वित छळ केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी सिव्हील लाईन मधील हॉटेल व्यावसायिक हरदिपसिंग अरोरा तसेच त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरदिपसिंगचा जुलै २०१५ मध्ये एका बड्या कुटुंबातील तरुणीसोबत (वय १९) मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. लग्नात मनासारखे मिळाले नाही, असे सांगून अरोरा परिवारातील सदस्य हरदिपसिंगच्या पत्नीला त्रास देऊ लागले. हा त्रास ती पती हरदिपसिंगला सांगत होती. मात्र, तिला दिलासा देण्याऐवजी हरदिपसिंग तिच्यावर अनैसर्गिक संबंधासाठी दबाव आणत होता. सासरच्या मंडळीसोबत त्याचाही अत्याचार असह्य झाल्याने पती-पत्नीत खटके उडू लागले. ते पाहून हरदिपसिंगच्या नातेवाईकांनी पीडितेची कोंडी करणे सुरू केले. या पार्श्वभूमीवर, हरदिपसिंगने पत्नीला बाहेर नेले. तेथेही त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यामुळे बाहेरून परतल्यानंतर तिने आपल्या माहेरच्यांना या असह्य त्रासाची कल्पना दिली. वाद मिटावा म्हणून हरदिपसिंगच्या सासरच्या मंडळींनी प्रतिष्ठितांना सोबत घेऊन दोन्ही कुटुंबीयांची समोरासमोर बैठक घेतली. अरोरा परिवारातील सदस्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. मात्र, या बैठकीत तोडगा निघण्याऐवजी वाद जास्तच वाढला. त्यानंतर गुरुद्वारा समितीकडे हा वाद पोहचला. तेथे समुपदेशन झाल्यानंतर काही दिवस चांगले गेले. नंतर मात्र, तसेच सर्व सुरू झाल्याने हरदिपसिंगच्या पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली. आधी जरीपटका, नंतर सदर पोलिसांकडून कारवाईसाठी टाळाटाळ झाल्याने पीडित महिलेने वरिष्ठांकडे धाव घेतली. तिची कैफियत ऐकून घेतल्यानंतर आज सायंकाळी अंबाझरी पोलिसांना तक्रार नोंदवून घेण्याचे वरिष्ठांनी आदेश दिले. त्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी हरदिपसिंग अरोरा, तेजपालसिंग अरोरा, अजिंदरकौर अरोरा, संदीपसिंग तेजपालसिंग अरोरा आणि ईशा अरोरा विरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देणे, मारहाण करणे, विनयभंग करणे आणि हरदिपसिंगविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करण्याचा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)