शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पित्याचा खून दडपणार्‍या पुत्रास नाकारला जामीन

By admin | Updated: May 9, 2014 00:14 IST

नागपूर : तब्बल साडेतीन वर्षांपर्यंत जन्मदात्याचा खून दडपणार्‍या एका पुत्राचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.

नागपूर : तब्बल साडेतीन वर्षांपर्यंत जन्मदात्याचा खून दडपणार्‍या एका पुत्राचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच याच प्रकरणी सुनेसह तिघांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला. पंकज दामोदरराव रघटाटे (३५) रा. ओमनगर, असे आरोपी पुत्राचे नाव आहे. संजय आनंदराव रघटाटे (४५) रा. धंतोली, दीप्ती पंकज रघटाटे (३२) आणि अनिल महादेवराव इखार (४७) रा. वर्धमाननगर, अशी आरोपींची नावे आहेत., ३० डिसेंबर २०११ रोजी शुक्रवारी तलावात ओमनगर येथील दामोदर सदाशिव रघटाटे (५८) यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. त्यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल त्यावेळी गणेशपेठ पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यानंतर साडेतीन वर्षानंतर नुकताच अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले होते की, २८ डिसेंबर २०११ रोजी मृत दामोदर हे आपला मुलगा पंकज, पुतण्या संजय, पंकजचा मित्र संजय भोकरे आणि जावई अनिल इखार कामठी मार्गावरील रनाळा येथील महाकाली मंदिराजवळ मद्य आणि मटण पार्टीसाठी एमएच -३३-एफ-१ क्रमांकाच्या टाटा सफारीने गेले होते. हे वाहन संजय भोकरे याच्या मालकीचे होते. या ठिकाणी मृत दामोदर यांच्या फ्रेम कारखान्यातील नोकर सुरेश पौनीकर, मित्र यादवराव पराते, रमेश निपाणे, चुडामण कुंभारे, महादेव टाकळीकर आणि पुष्पराज नंदनवार उपस्थित होते. पार्टी संपल्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सारेच आपापल्या घराकडे निघाले होते. परंतु दामोदर, संजय रघटाटे आणि संजय भोकरे हे छोटा ताजबाग येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री ९ वाजताच्या सुमारास दामोदर यांना त्यांच्या घरी सोडून देण्यात आले होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजता मृताचा पुतण्या संजय याने गांधीसागर तलाव गणेश घाट येथे मृताची स्कूटर आणि चपला दिसून आल्याचे कळवले होते. (प्रतिनिधी) पोलिसांनी जगदीश खरे याच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेतला होता. परंतु तो आढळला नव्हता. दुसर्‍या दिवशी मृतदेह तलावात तरंगताना आढळला होता. शवविच्छेदन अहवालावरून दामोदर यांना झोपेतच त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर मुलगा पंकज, सून दीप्ती आणि इतरांनी मृतदेह तलावात फेकून स्कूटर आणि चपला तलावाच्या काठावर ठेवून आत्महत्येचा देखावा निर्माण केला असावा, अशा दाट संशयावरून खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखला करून पंकजला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास गणेशपेठचे पोलीस निरीक्षक पी. वाय. मेश्राम करीत आहेत. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेढे तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सी. एच. शर्मा यांनी काम पाहिले.