शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरशी लढा देणाऱ्या महिलांसाठी ‘फॅशन शो’

By admin | Updated: March 1, 2016 02:58 IST

कॅन्सरवर मात करीत नव्या उमेदीने जीवन जगणाऱ्या महिला व लहान मुलांसाठी ‘रणरागिणी’ फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

देवता लाईफ फाऊंडेशन : मुग्धा गोडसे येणारनागपूर : कॅन्सरवर मात करीत नव्या उमेदीने जीवन जगणाऱ्या महिला व लहान मुलांसाठी ‘रणरागिणी’ फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देवता लाईफ फाऊंडेशनच्या वतीने ही स्पर्धा ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात होईल. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल मुग्धा गोडसे उपस्थित राहणार आहे.जीवघेण्या कॅन्सरवर मात करून आपल्या आयुष्यात नवी चेतना जागृत करून समाजापुढे एक नवा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या विविध वयोगटातील महिला या ‘फॅशन शो’मध्ये सहभागी होणार आहेत. अगदी लहान वयात कॅन्सरशी झुंज देणाऱ्या लहान मुलांचाही या ‘शो’मध्ये समावेश असणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या स्पर्धकांचे मनोबल वाढविण्यासाठी मुग्धा गोडसे उपस्थित राहणार आहे. नवी उमेद देऊन जगणाऱ्या लोकांना आनंदाचे काही क्षण देणे तसेच समाजाकडून त्यांचे कौतुक व्हावे व त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित व्हावा या उद्देशाने फाऊंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी देवता लाईफ फाऊंडेशनचे पदाधिकारी किशोर बावणे, सुधीर बाहेती, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. उषा साकुरे, नीलिमा बावणे, डॉ. सतीश देवळे, धनश्री गांधारे, रश्मी माजगावकर आदी परिश्रम घेत आहेत. या ‘शो’ची कोरियोग्राफी हर्षा झारिया यांनी केली असून वस्त्रालंकाराची संकल्पना निधी गांधी यांची आहे. (प्रतिनिधी)