शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मिळालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

ब्रिजेश तिवारी कोंढाळी : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ...

ब्रिजेश तिवारी

कोंढाळी : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र, या अनुदानापासून काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकरी अद्यापही वंचित आहेत. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकित कर्ज माफ केले होते. या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत काटोल आणि नरखेड तालुक्यात १२,३८८ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, यातील अनेक शेतकऱ्यांच्या थकित कर्जखात्यात सरकारने ही रक्कम जमा केली नाही. यासोबतच नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही.

काटोल तालुक्यात राष्ट्रीकृत, खासगी व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा एकूण २५ शाखा आहेत. २२ जूनपर्यंत नियमित कर्जाची परफेड करणाऱ्या १५३६ शेतकऱ्यांना १७ कोटी १ लाख ३८ हजार रुपये तर ४३१ शेतकऱ्यांना ५ कोटी १३ लाख ८९ हजार रुपये नवीन पीक कर्ज देण्यात आले.

तालुक्यात १९६७ शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१-२२ करीता २२ कोटी १५ लाख ६७ हजार रुपये पीक कर्जाचे वितरण करण्यात आले. तालुक्यात सर्वात अधिक पीक कर्जाचे वितरण कोंढाळी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेने केले आहे. या शाखेने १५१ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करून १ कोटी ६९ लाख ३८ हजार तर १२९ शेतकऱ्यांना १ कोटी ७७ लाख ८ हजार रुपये असे एकूण २ कोटी ९७ लाख १८ हजार रुपये पीक कर्जाचे वितरण केले आहे. पण यातील एकाही शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.

राज्यातील आघाडी सरकारने अनुदान वाटपाचे श्रेय घेण्यासाठी जाहिरातही केली होती. मात्र, लॉकडाऊन काळात हा विषय मागे पडला. कोरोनामुळे ग्रामीण भागात ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले. अशात सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. इकडे नियमित कर्जाची परफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे कोणतेही आदेश नसल्याची माहिती एका बँक व्यवस्थापकाने दिली.