शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित असूनही तुटपुंजे वेतन

By admin | Updated: December 24, 2014 00:43 IST

दोन विषयात एम. ए. करून बीएडची पदवी पूर्ण केली. नोकरीत लागल्यानंतर आपला संसारगाडा सुरळीत होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु १२ वर्षे नोकरीला होऊनही तुटपुंजे चार हजाराचे मानधन हाती पडते.

महिला शिक्षिकेची आपबिती : संसारगाडा चालविताना दमछाकदयानंद पाईकराव -नागपूरदोन विषयात एम. ए. करून बीएडची पदवी पूर्ण केली. नोकरीत लागल्यानंतर आपला संसारगाडा सुरळीत होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु १२ वर्षे नोकरीला होऊनही तुटपुंजे चार हजाराचे मानधन हाती पडते. दोन मुलांचे शिक्षण. कुटुंबात कमावणारी एकटीच अशा परिस्थितीत मुलांची पिढी घडविणारी सीमा बिसने या शिक्षिकेला कमालीचे नैराश्य आले आहे. शासनाने आतातरी अनुदान देऊन आपल्या नशिबातील वनवास संपविण्याची मागणी घेऊन त्या मोर्चात सामील झाल्या.सीमा शंकर बिसने असे या महिला शिक्षिकेचे नाव आहे. त्या आदर्श हायस्कूल दाभा ता. जि. भंडारात शिक्षिका म्हणून २००५ मध्ये रुजू झाल्या. आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल या आशेपोटी त्यांनी नऊ वर्षे केवळ चार हजार एवढ्या अल्पशा मानधनावर काम केले. त्यांची मोठी मुलगी पाचव्या वर्गात तर मुलगा पहिल्या वर्गात आहे. एवढ्या कमी तुटपुंज्या मानधनावर जगणे मुश्कील झाल्यामुळे त्या आपल्या शाळेला अनुदान देण्याच्या मागणीसाठी भंडारा-गोंदिया जिल्हा विना अनुदानित शिक्षक कर्मचारी एकता समितीच्या मोर्चात सहभागी झाल्या. अल्पशा मानधनात दोन वेळची भाकरी खायची की मुलांचे शिक्षण पूर्ण करायचे असा मोठा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. शासनाने आॅनलाईन केलेल्या मूल्यांकनात त्यांची शाळा ८१ टक्के गुण मिळवून अनुदानासाठी पात्र ठरली आहे. परंतु तरीसुद्धा अद्याप शासनाने अनुदान देण्यासाठी कुठलाच निर्णय घेतलेला नाही. विद्यार्थ्यांची पिढी घडवित असताना नैराश्याचे जीवन जगावे लागत असल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. किमान आतातरी शासनाने आमचा वनवास थांबवावा, अशी माफक अपेक्षा त्यांनी मोर्चात व्यक्त केली.