शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

फेरचौकशीवरील स्थगनादेशाला मुदतवाढ द्या

By admin | Updated: July 11, 2015 03:06 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एकल न्यायपीठाने आमदार सुनील केदार यांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील

सुनील केदारांचा हायकोर्टात अर्ज : सर्वोच्च न्यायालयात मागणार दाद नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एकल न्यायपीठाने आमदार सुनील केदार यांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्याशी संबंधित दोन रिट याचिका अनुक्रमे १ व २ जुलै रोजी फेटाळून लावल्या आहेत. यापैकी एका रिट याचिकेवर १ एप्रिल रोजी प्राथमिक सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने घोटाळ्याच्या फेरचौकशीवर अंतरिम स्थगनादेश दिला होता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करायची असल्यामुळे फेरचौकशीवरील अंतरिम स्थगनादेशाला दोन आठवड्यांपर्यंत मुदतवाढ द्यावी, असा विनंती अर्ज केदार यांनी उच्च न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.१४ जून २०१४ रोजी तत्कालीन सहकारमंत्र्यांनी घोटाळ्याची महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-१९६० मधील कलम ८८ अंतर्गत फेरचौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर शासनाने अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. २३ डिसेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाच्या युगलपीठाने ओमप्रकाश कामडी व इतरांची जनहित याचिका निकाली काढताना फेरचौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, केदार यांनी घोटाळ्याची फेरचौकशी करताना नव्याने पुरावे गोळा करण्यात यावेत, जुने पुरावे ग्राह्य धरण्यात येऊ नये यासाठी रिट याचिका दाखल केली होती. ही याचिका एकल न्यायपीठाच्या कार्यक्षेत्रात येत होती. गेल्या १ एप्रिल रोजी एकल न्यायपीठाने या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीनंतर फेरचौकशीवर अंतरिम स्थगनादेश दिला होता. खरबडे यांनी नाबार्ड व जिल्हा उपनिबंधकाद्वारे नामनिर्देशित दोन सदस्यांना वगळून कार्यकारी मंडळातील अन्य सर्व सदस्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ७२ (४) अंतर्गत नोटीस बजावली आहे. याविरुद्ध केदार यांनी दुसरी रिट याचिका दाखल केली होती. केदार यांच्या या दोन्ही रिट याचिका उच्च न्यायालयाच्या एकल न्यायपीठाने फेटाळून लावल्या आहेत. याशिवाय युगल न्यायपीठाने ३ जुलै रोजी खरबडे यांच्या विनंतीवरून फेरचौकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे खरबडे यांनी केदार यांना नोटीस बजावून ७ जुलैपासून फेरचौकशी सुरू करणार असल्याची सूचना दिली आहे.नवीन घडामोडीनुसार केदार यांना या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची आहे. परंतु, एका रिट याचिकेवरील आदेश व फेरचौकशीच्या मुदतवाढीचा आदेश उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अद्याप उपलब्ध झाला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यासाठी पुढील पाऊल उचलू शकत नसल्याचे केदार यांचे म्हणणे आहे. यामुळे १ एप्रिल रोजी फेरचौकशीवर दिलेला स्थगनादेश दोन आठवड्यांपर्यंत कायम ठेवण्यात यावा अशी विनंती त्यांनी अर्जात केली आहे.(प्रतिनिधी)