शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगात रेल्वे कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग

By admin | Updated: November 28, 2015 03:37 IST

सातव्या वेतन आयोगात रेल्वे कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून यात कर्मचाऱ्यांचे ५२ प्रकारचे भत्ते कमी करण्यात आले आहेत.

वेणु नायर यांची माहिती : आंदोलनासाठी ११ डिसेंबरला बैठकीचे आयोजननागपूर : सातव्या वेतन आयोगात रेल्वे कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून यात कर्मचाऱ्यांचे ५२ प्रकारचे भत्ते कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे या विषयावर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ११ डिसेंबरला दिल्लीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून बैठकीत ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे मुंबई मुख्यालयातील महामंत्री वेणु नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली.नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणु नायर म्हणाले, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१४ पासून करण्याची संघटनेची मागणी होती. परंतु ही अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ पासून करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या रजेत कुठलाही बदल करण्यात आलेला नसून बोनसही ३ हजार ५०० वरुन फक्त ७ हजार करण्यात आला आहे. घरभाडे भत्त्यातही ३० वरून २४ टक्के कपात करण्यात आली आहे. वेतनवाढही ५ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वेतनवाढीचा निर्णय अधिकारी घेणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ आणि उन्हातान्हात राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी वेतनवाढ अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.पत्रकार परिषदेला नितीन प्रधान, ‘एनआरएमयु’चे विभागीय सचिव हबीब खान उपस्थित होते. (प्रतिनिधी)