शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह आलेल्या नागपुरातील वनरक्षकाच्या मृत्यूमुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 01:12 IST

सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय बीट रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर मेयो येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली असून विना कामाने कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे वनविभागातील दुसरा मृत्यू : दोन कर्मचारीही होते बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय बीट रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर मेयो येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली असून विना कामाने कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.कामठी येथील रहिवासी असलेल्या या वनरक्षकाकडे बालोद्यान व जपानी गार्डनची जबाबदारी होती. २३ जुलैला त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे येथील वनकर्मचाऱ्यांना १४ दिवसासाठी होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले होते. नागपूर शहरातील वन विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वनभवनातील एका अकाऊंटंटचा कोरोनामृळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या ४५ वर्षीय लिपिक मित्राची चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. वनभवनाच्या मुख्यालयातील भांडार विभागात कार्यरत असलेली एक कंत्राटी सेवेतील महिला कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. वनरक्षकाच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बरेच नियंत्रण आणण्यात आले आहे.एनएमएमआरडीएचे अधिकारी पॉझिटिव्हसिव्हिल लाईन येथील नासुप्र कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील एनएमएमआरडीए कार्यालयातील कार्यकारी अभियंता गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा कक्ष सील करून निर्जंतुक करण्यात आला आहे. अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने नासूप्र कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडून घरचा रस्ता धरला. नासुप्रचे संपूर्ण कार्यालय निर्जंतुक करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूforest departmentवनविभागEmployeeकर्मचारी