बालिकेवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:13 IST2020-11-28T04:13:00+5:302020-11-28T04:13:00+5:30

कुही : घरी कुणीही नसल्याचे पाहून आराेपीने घरात प्रवेश केला आणि सात वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग केला. ही घटना वेलतूर ...

Excess on the girl | बालिकेवर अतिप्रसंग

बालिकेवर अतिप्रसंग

कुही : घरी कुणीही नसल्याचे पाहून आराेपीने घरात प्रवेश केला आणि सात वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग केला. ही घटना वेलतूर येथे गुरुवारी (दि. २६) दुपारी २ ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली असून, आराेपीस अटक करण्यात आली आहे.

दादाराव गाेवर्धन बन्साेड (४०, रा. वेलतूर, ता. कुही) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. पीडित बालिकेची आई दुपारी शाैचास बाहेर गेली हाेती. त्यामुळे ती घरी एकटीच हाेती. हीच संधी साधून दादाराव तिच्या घरी गेला आणि तिला १० रुपये दिले. एवढेच नव्हे तर त्याने त्या बालिकेवर अतिप्रसंग केला. तिने आरडाओरड केली असता, त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. काही वेळाने आई घरी परत आल्यावर तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यामुळे आईने लगेच पाेलीस ठाणे तक्रार दाखल केली. तिच्या वैद्यकीय तपासणीवरून अत्याचार झाल्याचे स्पष्ट हाेताच वेलतूर पाेलिसांनी भादंवि ३७६, ३७६ (अ), (ब), ५०६, पाेक्साे ॲक्ट सहकलम ४, ६ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी दादारावला अटक केली. या घटनेचा पाेलीस निरीक्षक सुचिता मंडावले करीत आहेत.

Web Title: Excess on the girl