शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशबंदी कायम की हटली?

By admin | Updated: July 8, 2014 01:16 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर लावलेल्या प्रवेशबंदीच्या मुद्यावर सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रवेशबंदी हटली पाहिजे,

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा : अधिकाऱ्यांमध्येच संभ्रमनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर लावलेल्या प्रवेशबंदीच्या मुद्यावर सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रवेशबंदी हटली पाहिजे, असा सूर या बैठकीत निघाला. परंतु बैठकीनंतर मात्र विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये या मुद्यावरून किती संभ्रम आहे याचे प्रत्यंतर आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी प्रवेशबंदी हटलेली नाही, असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे बीसीयूडी संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांनी मात्र ज्या महाविद्यालयांनी नवीन निकषांनुसार प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे ते विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात, असे प्रतिपादन केले. कुलगुरूंचे ‘ना’ आणि डॉ. कोमावारांचे ‘हा’ यामुळे नेमकी प्रवेशबंदी हटली की नाही, यासंदर्भात संभ्रम वाढीस लागला आहे.एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या २५० महाविद्यालयांवर ७ जून २०१३ रोजी विद्यापीठाने प्रवेशबंदी लावली होती. त्यानंतर विद्यापीठात गेल्या वर्षभरापासून सातत्याने या मुद्यावर चर्चा, आंदोलने सुरू आहेत. शिवाय संबंधित प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रवेशबंदीसंदर्भात चर्चा झाली. ज्या महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांची नावे प्रवेशबंदीच्या यादीतून हटली पाहिजे, असा सूर या बैठकीत निघाला. जवळपास ४३ महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे यासंदर्भातील शपथपत्र जमा केले असल्याने त्यांची नावे यादीतून वगळली पाहिजे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले. परंतु संबंधित मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाला याची माहिती द्यावी लागेल, असे सदस्यांनी सुचविले.व्यवस्थापन परिषदेची बैठक आटोपल्यानंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांना यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता, त्यांनी अद्याप प्रवेशबंदी हटविण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. परंतु त्यानंतर ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली. प्रवेशबंदीची ही यादी २०१३-१४ या सालासाठी होती. शिवाय २०१४-१५ सालासाठीच्या नवीन निकषांनुसार ज्या महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे ते विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. डॉ. कोमावार यांना यासंदर्भात वारंवार विचारणा केल्यावर त्यांनी संबंधित महाविद्यालयांची प्रवेशबंदी हटविण्यात आली आहे, हे मान्य केले. यावेळी काही संस्थाचालकदेखील उपस्थित होते, हे विशेष. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)